Jalgaon corporation Jalgaon corporation
जळगाव

नगरोत्थान योजनेंतर्गत जळगावसाठी २२ कोटींची कामे मंजूर

नगरोत्थान योजनेंतर्गत जळगावसाठी २२ कोटींची कामे मंजूर

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : शहरातील विविध विकासकामांसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत २२ कोटी ८६ लाख ९८ हजारांचा निधी पालकमंत्र्यांनी मंजूर केला होता. महापौर जयश्री महाजन यांनी केलेल्या पाठपुराव्याने (Jalgaon corporation) त्यौपकी २१ कोटी ९८ लाख ९४ हजारांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश गुरुवारी काढले आहेत. (jalgaon-corporation-Maharashtra-Golden-Jubilee-Urban-Development-Campaign-fund-available)

जळगाव शहरातील विविध विकासकामांसाठी पालकमंत्री गुलाबराब पाटील (Minister Gulabrao patil) यांच्या माध्यमातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत २२ कोटी ८६ लाख ९८ हजारांचा निधी प्राप्त झाला होता. नगरोत्थान योजनेंतर्गत प्राप्त कामांच्या प्रस्तावाला मंजुरीचे अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले आहे. जळगाव मनपाकडून रस्ते, गटारी, उद्यान, जीम अशा विविध कामांचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. शहरातील परिस्थिती लक्षात घेता प्रस्तावाला लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी महापौर जयश्री महाजन यांनी पाठपुरावा केला होता. महापौरांच्या पाठपुराव्याने प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.

मंजूर झालेल्या कामांची पुढील प्रक्रिया लागलीच सुरू करण्यात येणार असून मार्च अखेरपर्यंत काम पूर्ण करण्यात येतील. यातून रस्ते, गटाराच्या कामांना प्राधान्य दिले जाईल.

- जयश्री महाजन (महापौर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pilbhit Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पात विकेंड सफारी महागली; शनिवार-रविवारचे तिकीट २०० रुपयांवर, काय आहे कारण ?

Team India Live Streaming: सुपर संडे! भारताचे दोन मोठे सामने, Asia Cup Final अन् अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार टी२०; कुठे पाहाणार?

Ukadiche Modak Recipe: केशराचा सुगंध, नारळ-गुळाची गोडी आणि 'हा' एक पदार्थ… बाप्पासाठी असे बनवा स्पेशल उकडीचे मोदक!

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

SCROLL FOR NEXT