amalner police action sakal
जळगाव

पोलिसांनी उघडली ‘कारवाईची मुठ’ सव्वा लाखाची!

पोलिसांनी उघडली ‘कारवाईची मुठ’ सव्वा लाखाची!

राजेश सोनवणे

अमळनेर (जळगाव) : कोरोनाच्या पहिल्‍या लाटेत हॉटस्पॉट (Coronavirus hotspot amalner city) ठरलेल्या अमळनेर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागली. सद्यस्थितीत लॉकडाउनमध्ये पोलीस प्रशासनाने रात्रदिवस कडक पहारा (jalgaon lockdown) देऊन गेल्या आठवड्याभरात ५४८ व्यक्तींवर कायद्याचा दंडुका उगारला आहे. त्यांच्याकडून सुमारे सव्वा लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. परिणामी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांचा (Police action against unruly citizens) हा उपाय चांगलाच लक्षवेधी ठरत आहे. (jalgaon-amalner-coronavirus-lockdoewn-police-action-people-on-road)

शहरात ‘ब्रेक द चैन’ या (Break the chain) अंतर्गत पोलिसांनी विविध ठिकाणी आपला बंदोबस्त लावला आहे. कारवाईचा दंडुका उगारलेल्यामुळे काही प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी मदत झाली आहे. विनाकारण ज्या व्यक्ती फिरतात त्या व्यक्तींवर पोलिसांनी अँटीजन टेस्ट केली आहे. गेल्या आठवड्याभरात ६२४ व्यक्तींची अँटीजन टेस्ट केली. यात केवळ तीनच व्यक्ती कोरोना बाधित आढळले. कलागुरू मंगल कार्यालय, पैलाड तसेच गलवाडे रोडवर नाकाबंदी करण्यात आली आहे.

शहरात येणाऱ्या- जाणाऱ्यांवर वॉच

शहरात येणारे तसेच बाहेर जाणाऱ्या व्यक्तींवर वॉच ठेवली जात आहे. विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींकडून दंड वसूल करण्यात येत आहे. जे मोटरसायकल धारक विना हेल्मेट दिसत असतील त्या ३८ व्यक्तींवर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. एम ऍक्ट चलनाद्वारे दंड भरण्यात येत आहे. यासाठी पोलीस आणि नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करून अनेक ठिकाणांची दुकानेही सील करण्यात आली आहे. प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड, पोलीस उपअधीक्षक राकेश जाधव, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेली या सर्व कारवाई मुळे सुज्ञ नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

तारीख... अँटीजन टेस्ट(पॉझिटीव्ह)... कारवाई (व्यक्ती)... दंड

२४ मे……..९७ (२)………….. ८६ व्यक्ती...….. २० हजार ८००

२५ मे……..१२३ (०).........…..१०९ व्यक्ती…….२३ हजार ७००

२६ मे……निरंक……………... ७१ व्यक्ती…….. १९ हजार ७००

२७ मे…….निरंक…………….. ६९ व्यक्ती…….. १७ हजार ९००

२८ मे...….१७१(१)…………..८६ व्यक्ती…….. १८ हजार ६००

२९ मे…….१८६(०)…………. ५६ व्यक्ती...…..१२ हजार १००

३० मे……. ४७ (०)…………. ७१ व्यक्ती……..१७ हजार

एकूण….. ६२४(३)…………... ५४८ व्यक्ती.......१ लाख २९ हजार ८००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT