Jalgaon aurngabad highway Jalgaon aurngabad highway
जळगाव

प्रगतीचा महामार्ग..जळगावपर्यंतचे चौपदरीकरण पूर्णत्वाकडे

प्रगतीचा महामार्ग..जळगावपर्यंतचे चौपदरीकरण पूर्णत्वाकडे

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या व जगविख्यात अजिंठा लेणीमुळे (Ajanta Caves) खास ठरलेल्या औरंगाबाद- जळगाव महामार्ग चौपदरीकरणाचे (Jalgaon aurngabad highway) काम जवळपास पूर्णत्वाकडे आले आहे. १५५ किलोमीटर टप्प्यातील या मार्गात दोन किंवा तीन ठिकाणी टोल नाका असेल. त्यापैकी दोघा नाक्यांवर टोल भरणे अनिवार्य असेल, असे नियोजन होण्याची शक्यता आहे. (jalgaon-aurngabad-highway-fourway-work-nitin-gadkari)

चार वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांनी रखडलेल्या औरंगाबाद-जळगाव महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वर्षभरात बऱ्यापैकी मार्गी लागले. राज्य महामार्ग असला तरी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरींनी त्यास विशेष बाब म्हणून चौपदरीकरणास मंजुरी देऊन दीड हजार कोटींच्या निधीची तरतूद केली.

तीन वर्षे रखडले काम

१५५ किलोमीटरच्या या काँक्रिटच्या चौपदरी महामार्गाच्या कामाचे कंत्राट हैदराबादच्या एजन्सीकडे देण्यात आले आहे. हायब्रीड ॲन्युईटी तत्त्वावरील या कामाला सुरवात झाली. मात्र मक्तेदार कंपनी दिवाळखोरीत गेली. त्यामुळे काम रखडले. मात्र, तोपर्यंत हा मार्ग संबंधित कंपनीने दोन्ही बाजूंनी खोदून ठेवला. त्यामुळे तीन-साडेतीन वर्षे या मार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली होती.

गडकरींकडून दखल

या महामार्गाच्या स्थितीवरुन माध्यमांमध्ये टीका झाली. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ‘सु मोटो’ याचिका दाखल करून घेतली. अखेरीस केंद्रीय मंत्री गडकरींनी हे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले व उपकंत्राटदारांना तीन टप्प्यांत काम विभागून देऊन ते सुरू करण्यासंबंधी आदेश दिले.

काम आता पूर्णत्वाकडे

तीन वर्ष खर्ची गेल्यानंतर दीड वर्षापासून या कामाने गती घेतली. वर्षभरापासून सातत्याने लॉकडाउन असतानाही कामे सुरू राहिली. सहा महिन्यांत कामाचा वेग वाढला व आता हे काम जवळपास पूर्णत्वाकडे आले आहे. औरंगाबाद-सिल्लोडचा टप्पा पूर्ण झाला असून, सिल्लोड-फर्दापूर या ४० किलोमीटरच्या टप्प्यात अजिंठा घाटातील वनक्षेत्रामुळे अडचणी आल्या. त्याही दूर झाल्या आहेत. फर्दापूर ते जळगावपर्यंतच्या टप्प्यातही बऱ्यापैकी काम झाले आहे.

पुलांचे काम सुरू

लहान-मोठे नाले, नदी व मोऱ्यांवरील पुलांचे काम तसेच वळण रस्त्यांवरील काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. जळगाव तालुका क्षेत्रात रस्त्याच्या मध्ये दुभाजक भरण्याचे कामही सुरू आहे. चार-सहा महिन्यांत रस्त्याचे काम पूर्ण होईल, असा दावा केला जात आहे.

दोन-तीन टोलनाके

धुळे-नाशिक टप्प्याचे अंतर १५० किलोमीटर असून, या मार्गावर धुळ्याजवळ पुढे चांदवड व नंतर पिंपळगावनजीक असे तीन टोल नाके आहेत. पैकी दोन ठिकाणी टोल देणे अनिवार्य आहे. त्याच धर्तीवर जळगाव-औरंगाबादचे अंतरही १५५ किलोमीटर असल्याने या टप्प्यात दोन-तीन ठिकाणी टोलनाके असतील. पैकी दोन ठिकाणी टोल भरावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cold Wave : पुणे तापमानात होतयं उणे, राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार; ४ दिवसांचा हवामान विभागाचा अंदाज आला समोर

Sangli Crime : सांगलीत चाललंय काय? जतमध्ये नग्नावस्थेत तोंड, डोके ठेचून तरुणाचा निर्घृण खून; डोक्यात गंभीर जखमा

Latest Marathi News Live Update : राज्यातील २४ नगरपरिषदांसाठी आज मतदान; कर्मचारी पोहोचले मतदान केंद्रांवर

Air Pollution : वाकड, रावेतला प्रदूषणाचा विळखा; आरएमसी प्लांटमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम

'सुंदरा मनामध्ये भरली' फेम मराठी अभिनेत्रीची 'तस्करी'मध्ये एन्ट्री; इम्रान हाश्मीसोबत शेअर करणार स्क्रीन

SCROLL FOR NEXT