bank crowd sakal
जळगाव

बँकेबाहेर होतेय ग्राहकांची तोबा गर्दी; एटीएम बंदचा परिणाम

बँकेबाहेर होतेय ग्राहकांची तोबा गर्दी; एटीएम बंदचा परिणाम

सकाळ डिजिटल टीम

भुसावळ (जळगाव) : शहरातील विविध बॅंकाच्या प्रवेशद्वाराबाहेर महिलांसह ज्येष्ठ नागरिकांनी बँकेचे व्यवहार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी कोरोना नियमाची पायमल्ली होताना दिसून येत आहे. (Coronavirus jalgaon lockdown bank people crowd ATM close)

कोरोना दुसऱ्या लाटेच्या (Coronavirus) पार्श्‍वभूमीवर शासनाने कडक निर्बंध लादले आहे, 31 मे पर्यंतचा लॉकडाऊन (Jalgaon bhusawal lockdown) पुढे 15 जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे. तालुक्यासह जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णाची संख्या जरी कमी होत असली तरी तिसऱी लाट येणार हे गृहीत धरून कडक निर्बंध लादण्यात आले आहे, मात्र भुसावळ शहरांमध्ये अनेक बँकाच्या प्रवेशद्वारा समोर दैनंदिन व्यवहार चालावे याकरिता महिलांसह जेष्ठ नागरिक बँकेच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसून येत आहे यामुळे पूर्णता कोरोना नियमाची पायमल्ली होताना दिसून येत आहे.

एटीएम बंद नागरिकांची फिराफिर

जिल्हा निर्मितीकडे वाटचाल करणाऱ्या शहरात लोकसंख्येच्या मानाने फारच कमी एटीएम सुरू आहे, उपलब्ध आहे त्यातही 70 टक्के एटीएम फक्त नावापुरता सुरू असून प्रत्यक्षात एटीएम वर गेल्यावर तांत्रिक कारणामुळे, बिघाडामुळे, मशीन बंद असल्या कारणाने अशा अनेक कारणांचे फलक एटीएमचे प्रवेशद्वार लावल्याचे दिसून येत आहे. तर काही बोटावर मोजण्या इतकेच एटीएम सुरू असून त्यातही काही तासातच रक्कम संपून जाते. यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून, असह्य उन्हात नागरिकांची फिरफिर होत असतानाचे चित्र दिसून येत आहे. प्रत्येक बँकेच्या व्यवस्थापनाने आपापले एटीएमची दुरुस्ती करून तांत्रिक अडचणी दूर करून, नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranji Trophy: विदर्भाचा २३ वर्षीय गोलंदाजाचा विकेट्सचा षटकार; ध्रुव जुरेलला शतकापासून रोखलं

खरंच गरज होती का? टीआरपीसाठी अल्पवयीन अभिनेत्रीकडून करून घेतला असा सीन; मालिकेवर नेटकरी संतापले

Video: सूरज चव्हाणने घेतलं अजितदादांच्या चितेचं दर्शन; भावुक होत म्हणाला, मी कोणाकडे बघायचं...

Latest Marathi News Live Update : नाशिक -मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटात अपघात, ट्रेलर पलटी

Yogi Government : योगी सरकारचा मास्टरस्ट्रोक! १५ लाख शिक्षकांसाठी ४४८ कोटींची मोफत आरोग्य कवच योजना

SCROLL FOR NEXT