railway water machin railway water machin
जळगाव

हे तर अजबच..परवडेना म्‍हणून रेल्‍वे स्‍थानकावरील वॉटर मशीन बंद, प्रवाशांच्या घशाला कोरड

हे तर अजबच..परवडेना म्‍हणून रेल्‍वे स्‍थानकावरील वॉटर मशीन बंद, प्रवाशांच्या घशाला कोरड

सकाळ डिजिटल टीम

भुसावळ (जळगाव) : भुसावळसह विभागातील सर्व प्रमुख स्थानकांवर बसविण्यात आलेली वॉटर वेंडिंग मशीन (Water weding machine) सध्या बंद आहेत. यामुळे, प्रवाश्यांना (railway) शुद्ध आणि थंड पाण्यासाठी १५ रुपये देऊन बाटलीबंद पाणी खरेदी करावे लागत आहे. (bhusawal railway station water seding machin close)

सध्या तापमानाचा पारा वाढत असताना, प्रवासात जीवाची लाहीलाही होते. अशा वेळी थंड पाण्याचा एकमेव आधार असतो. मात्र रेल्वे स्थानकावर बसविण्यात आलेली वॉटर वेंडिंग मशीन बंद पडल्या आहेत. या मशीनद्वारे प्रवाशांना केवळ एक रुपयात एक लिटर शुद्ध आणि गार पाणी मिळत असे. परंतु आता या मशीन बंद पडल्याने प्रवाशांच्या घशाला कोरड पडत आहे.

सर्व मशीन बंद

भुसावळ रेल्वे विभागातील स्थानकांवर एकूण ३९ वेंडिंग मशीन बसविण्यात आल्या आहेत. त्यापैकी २ वर्षांपूर्वी भुसावळ रेल्वे स्थानकात १६ मशीन्स बसविण्यात आल्या होत्या. सर्व मशीन सध्या बंद आहेत. यामुळे प्रवाशांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वेने प्रवाशांना स्वस्त दरात शुद्ध आणि थंड पाणी मिळण्यासाठी ही व्यवस्था केली होती. कोरोना महामारीच्या अगोदर हे बूथ पूर्ण क्षमतेने चालविले जात असत. मात्र कोरोनामुळे रेल्वे बंद पडल्याने ही बूथ देखील बंद होती.

महाग बाटलीबंद पाणी

लॉकडाऊननंतर गाड्या पुन्हा सुरू झाल्या आहेत, तेव्हापासून त्यांची संख्या आणि त्यामध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सतत वाढत आहे. आता रेल्वे स्थानकातही प्रवाशांची गर्दी झाली आहे. त्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. मशीन बंद पडल्याने प्रवासी स्टॉल्स व रेस्टॉरंटमधील महाग बाटलीबंद पाणी पिऊन पित आहेत. स्टॉल आणि रेस्टॉरंटमधून एक लिटर पाणी १५ रुपयांना उपलब्ध होते. जर ही मशीन्स कार्यरत झाली असती, तर प्रवाशांना १ रुपयात ते सहज उपलब्ध झाले असते.

ठेकेदारांना नुकसान होत असल्याने मशीन बंद

गेल्या वर्षी कोरोनामुळे रेल्वेगाड्या बंद होत्या. तेव्हा रेल्वे स्थानकावर पाण्याची आवश्यकता नव्हती. मात्र देशात अनलॉक नंतर रेल्वेगाड्या हळूहळू वाढत गेल्याने प्रवाशांची वर्दळही वाढली. अशात प्रवाशांसाठी पाण्याची आवश्यकता भासू लागली आहे. मात्र बराच काळ मशीन बंद ठेवल्याने ठेकेदारांना यात नुकसान सहन करावे लागणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ते मशीन पुन्हा सुरू करत नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला मशीन विकून टेंडरची रक्कम वसूल करणे भाग पडत आहे. मात्र रेल्वेने आगीदरच कंत्राटदाराकडून सुरक्षा अनामत घेतली असती तर ही वेळ आली नसती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav 2025 : पुण्यात गणेश प्रतिष्ठापनेनिमित्त वाहतुकीत बदल, 'हे' रस्ते वाहतुकीस राहणार बंद; पर्यायी मार्गांविषयी जाणून घ्या

MLA Shashikant Shinde: प्रशासन कुणाच्या तरी दबावाखाली काम करतंय: आमदार शशिकांत शिंदे; सध्याची परिस्थिती बदलण्यासाठी जागरूक राहावे

Satara Teachers Bank: 'सातारा शिक्षक बॅंकेची १५ मिनिटांत गुंडाळली वार्षिक सभा'; गैरकारभार, नोकर भरती आदी मुद्द्यांवरून घोषणाबाजी

चेतेश्वर पुजाराची काल निवृत्ती अन् आज दुसऱ्या खेळाडूने माफी मागून मागे घेतला निवृत्तीचा निर्णय; देशासाठी खेळण्यास पुन्हा सज्ज...

Crime News: धक्कादायक ! ६७ वर्षांच्या प्रियकराने ३० वर्षांच्या प्रेयसीची केली हत्या, ३ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT