parivahan bus accident 
जळगाव

बस चालकाची सावधानता; म्‍हणून वाचला सर्व प्रवाशांचा जीव

अमोल अमोदकर

बोदवड (जळगाव) : बोदवड- जळगाव बस (क्रमांक एम.एच. 19 बी. एल. 1596) बोदवड बसस्‍थानकातून निघून जळगावी येण्यासाठी मार्गस्‍थ झाली. यावेळी बसमध्ये किमान 35 ते 40 प्रवासी होते. सर्व प्रवाशांवर संकट ओढवले होते. मात्र चालकाची सावधानता कामी आली.

जळगाव- बोदवड बस जळगावी परत येण्यासाठी बोदवड बसस्‍थानकातून चाळीस प्रवाशी घेवून निघाली. बसचे लक जगदीश देवचंद लोखंडे होते. बस मार्गस्‍थ झाली त्‍यावेळी रिमझिम पाऊस देखील सुरू होता. बस सुरवाडेमार्गे निघाली असताना सुरवाडे खुर्द गावाजवळ आली असताना रिमझिम पाऊस सुरु असताना प्रवासी गाडीतून उतरवण्यासाठी गाडीचा वेग कमी करून ब्रेक दाबला असता गाडीचे स्टेअरींग लाँक झाल्याचे चालक लोखंडे यांच्या लक्षात आली. यामुळे फिरविलेले स्‍टेअरींग बसला रस्त्याच्या बाजुने खोलगट भागात नेवून पलटी होवून मोठा अपघात होण्याची शक्‍यता होती. यामुळे प्रवाशाचे प्राण देखील जाण्याची भिती होती.

प्रसगांवधान राखले
जिवावर बेतणारा प्रसंग होऊ शकत होता. मात्र वाहनचालक जगदीश लोखंडे यांच्या सावधगिरीमुळे मोठा अनर्थ टळला. बस चालक लोखंडे यांनी रस्त्याच्या बाजूला लावलेल्या बंद टँकर ट्रॉलीवर बस ठोकली. यात गाडीच्या समोरील बाजुच्या काचा फोडल्या गेल्या. यामुळे साधारण 25 हजार रूपयांचे नुकसान झाले. मात्र प्रवाशांचा जीव वाचू शकला. घटनेबाबत चालक लोखंडे यांनी वरीष्ठांशी चर्चा करून बोदवड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : अजितदादा पंचतत्वात विलीन; पुत्र पार्थ आणि जय यांनी दिला मुखाग्नी

Ajit Pawar Funeral News Updates : अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पूर्ण, अश्रूंनी व जड अंतःकरणाने अखेरचा निरोप

T20 World Cup: संजू सॅमसन OUT, इशान किशन IN! वर्ल्ड कपमध्ये उतरणारी भारताची तगडी Playing XI

Black Box : विमानाचा ब्लॅक बॉक्स म्हणजे नेमकं काय? छोट्याशा यंत्रातून कशी कळते अपघाताची संपूर्ण माहिती..पाहा अचंबित करणारी टेक्नॉलॉजी

Ajit Pawar Passed Away : तेरचा लाडका जावई हरपला... ग्रामस्थांनी साश्रू नयनांनी अजितदादांना वाहिली श्रद्धांजली

SCROLL FOR NEXT