pension holders
pension holders pension holders
जळगाव

पेन्शनधारकांची बॅंकेत होतेय फरपट; बॅंकांची वेळेत कपातीमुळे होतेय अडचण

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : राज्यात, तसेच जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर संचारबंदीदरम्यान बॅंकांचे (Bank work) कामकाजाच्या वेळेत कपात करण्यात आली आहे. शिवाय साथरोग प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलबजावणीमुळे बॅंकेत मोजक्याच व्यक्तींना प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे ज्येष्ठ पेन्शनधारकांना (Pension holders) तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. (corona bank entry time limit and pension holders return)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जिल्ह्यात दररोज हजारोंच्या संख्येने बाधित रुग्णसंख्या आढळून येत आहे. ही संसर्ग साखळी खंडित करण्यासाठी राज्य शासन निर्णयानुसार जिल्ह्यात लॉकडाउन व सकाळी ११ नंतर संपूर्ण दिवसभरासह सकाळी सातपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. शासकीय कार्यालयांमध्ये देखील एकूण कर्मचारी संख्येच्या केवळ १५ कर्मचारी उपस्थितीचे निर्देश देण्यात आले आहेत. तर दुसरीकडे जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात सर्वच ठिकाणी राष्ट्रीयाकृत बँक प्रशासनाकडून त्यांच्या कामकाजाच्या वेळेत कपात करण्यात आली आहे.

दहा ते दोनपर्यंतच प्रवेश

बऱ्याच ठिकाणी बॅंकांचे दैनंदिन कामकाजादरम्यान आर्थिक देवाण-घेवाण करण्यासाठीची वेळ तीन ते चारपर्यंत होती. परंतु सद्यःस्थितीत कोरोना संसर्ग टाळण्यासाठी अत्यंत कमी व्यक्तींना ते देखील केवळ सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंतच बॅंकेत प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना वेळेअभावी परत जावे लागत आहे. बहुतांश ज्येष्ठ सेवानिवृत्त नागरिकांचे पेन्शन राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये आहे. पेन्शन घेण्यासाठी आलेल्या व्यक्ती, तसेच अन्य खातेदारांकडून कमी-अधिक प्रमाणात रोख रकमेचा भरणा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली जात आहे. तर अनेक खातेदार केवळ त्यांचे झालेल्या व्यवहारांच्या आर्थिक नोंदी पासबुक भरून घेण्यासाठी गर्दी करताना दिसतात.

बहुतांश पेन्शनधारक पेन्शनची रक्कम काढण्यासाठी सकाळी दहापासून रांगेत उभे राहून आपला नंबर केव्हा येईल याची प्रतीक्षा करत असतात. या ठिकाणी येणाऱ्या युवकांकडून शारीरिक अंतराचे पालन केले जात नाही. सर्वच खातेदारांना एकाच रांगेत ताटकळत उभे राहावे लागू नये, यासाठी ज्येष्ठ नागरिक पेन्शनधारकांना स्वतंत्र रांगेसह बैठकव्यवस्था करण्यात यावी.

-हिरामण जाधव, पेन्शनर प्राथमिक शिक्षक

वर्षभरात दोन वेळा मार्चअखेर व डिसेंबरपूर्वी हयात असल्याचा पुरावा सादर करावा लागतो. तसेच सद्यःस्थितीत पेन्शनची रकम खात्यातून घेण्यासाठी स्वत: पेन्शनधारक उपस्थित असणे आवश्यक असते. त्यामुळे सद्यःस्थितीत बॅंकांकडून देण्यात आलेले वेळेचे बंधन पाहाता ज्येष्ठ नागरिक, पेन्शनधारकांना प्राधान्य देण्यात आले तर त्यांना वारंवार फिरफीर करावी लागणार नाही.

-सर्जेराव पोकळे, सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah: बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लॅन बी काय आहे? अमित शाह काय म्हणाले जाणून घ्या...

IPL 2024: हैदराबादनेही प्लेऑफचं तिकीट केलं पक्कं! आता RCB vs CSK सामना लावणार चौथ्या संघाचा निकाल, पाहा कसं आहे समीकरण

Devendra Fadanvis: लोकसभेनंतर आता फडणवीसांनी सांगितलं विधानसभेचं गणित; मुख्यमंत्रीपदाबाबत केलं मोठं वक्तव्य

Char Dham Yatra 2024: सावधान नाहीतर रीलच्या नादात जाल जेलमध्ये...उत्तराखंड सरकारने घेतला मोठा निर्णय, अधिकारी तळ ठोकून

Nepal Bans: आता नेपाळनेही MDH, EVEREST मसाल्यांवर केली मोठी कारवाई; आयात आणि विक्रीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT