marriage
marriage marriage
जळगाव

कोरोना निर्बंधांमुळे विवाह नोंदणीतही घट

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा (Coronavirus) फटका विवाह नोंदणीलाही बसला होता. या काळात संचारबंदीसह (Corona antigen test and lockdown) कोरोनाची ॲन्टिजेन चाचणी, नंतर आरटीपीसीआर चाचणीची सक्ती करण्यात आली होती. यामुळे नोंदणी पद्धतीने विवाह करण्याच्या (Jalgaon marriage registration) संख्येतही घट झाली होती. (jalgaon-Corona-restrictions-reduce-marriage-registration)

सन २०१९-२० मध्ये एकूण ४३६ नोंदणी विवाह झाले होते. ते यंदा (२०२०-२१) ३६३ विवाह झाले असल्याची माहिती विवाह नोंदणी विभागाच्या सूत्रांनी दिली. यंदा मात्र कोरोनाचे निर्बंध नसतील, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

मुद्रांक शुल्‍क वसुलीला फटका

कोरोनाच्या पहिल्या लाटेत संचारबंदीचे निर्बंध लावण्यात आले होते. याकाळात महसुलाचे प्रमाण घटले होते. तूट भरून काढण्यासाठी राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात दोन ते तीन टक्के सवलत देण्यात आली होती. त्यामुळे दस्त नोंदणीत काही प्रमाणात वाढ झाली. मात्र ती सवलत केवळ मार्च २०२१ पर्यंतच होती. महसुलात प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे जिल्ह्याच्या महसुली उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असलेल्या मुद्रांक शुल्क वसुलीला मोठा फटका बसला आहे. ही तूट भरून निघण्यासाठी सप्टेंबर २०२० पासून ग्रामीण भागात दोन, तर शहरी भागासाठी तीन टक्के मुद्रांक शुल्कात सवलत मार्च २०२१ पर्यत देण्यात आली होती. मार्च २०२१ अखेर ८३ हजार ८४४ दस्त नोंदणी करण्यात आली. नवीन आर्थिक वर्षातील एप्रिल आणि मेदरम्यान पाच हजार २२९ दस्तांची नोंदणी झाली.

विवाह नोंदणीवर निर्बंधांचा परिणाम

सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या विवाहप्रसंगी केवळ २५ नागरिकांच्या उपस्थितीसह वेळेचे निर्बंध लागू करण्यात आले होते. यामुळे यंदा विशेष विवाहांच्या नोंदणीतही घट झालेली आहे. २०२०-२१ मध्ये केवळ ३६३ विशेष विवाहांची नोंद झाली. एप्रिल ते मे या दोन महिन्यांच्या कालावधीत ७९ विवाहाची नोंद करण्यात आली.

आकडे बोलतात

वर्ष झालेले विवाह

२०१७-१८ - ३८०

२०१८-१९ - ४२६

२०१९-२० - ४३६

२०२०-२१ - ३६३

२०२१-२२ - ७९

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satish Joshi: ज्येष्ठ अभिनेते अभिनेते सतीश जोशी यांचे निधन; स्टेजवरच घेतला अखेरचा श्वास

Arvind Kejriwal : ''मी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नसलो तरी...'' अरविंद केजरीवाल थेटच बोलले

MS Dhoni CSK vs RR : चाहत्यांना विनंती आहे की सामन्यानंतर... राजस्थानच्या मॅचनंतर धोनी निवृत्ती घेणार?

Sunil Gavaskar IPL 2024 : आयपीएल सोडून देशाकडून खेळणाऱ्या खेळाडूंना शिक्षा करा! गावसकरांनी BCCI कडे केली मागणी

IPL 2024 CSK vs RR Live Score : राजस्थानची संथ फलंदाजी; सिमरजीतने पाडलं खिंडार

SCROLL FOR NEXT