collector abhijit raut 
जळगाव

जिल्‍हाधिकारीच पोहचले लग्‍न मंडपात; वर- वधू पित्‍यांवर गुन्हे दाखल

सकाळवृत्तसेवा

जळगाव : कोरोना संसर्ग वाढत असून राज्य शासनासह जिल्‍हा प्रशासन खबरदारीच्या उपाय योजना करण्यासाठी वारंवार आवाहन करत आहे. तरी देखील सामान्य जनता निर्धास्तपणे वागत असल्याचे दस्तुरखूद्द जिल्‍हाधिकाऱ्यांनी अनुभव घेतला. औद्योगीक वसाहत येथील लॉन्स, हॉटेल्ससह विवीध मंगल कार्यालयात सुरु असलेल्या लग्न सोहळ्यात धडकत जिल्‍हाधिकाऱ्यांनी आयोजक, वर- वधु पिता, जागा मालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्यावर कारवाईचे निर्देष दिले होते. मंगल कार्यालय, लॉन्स, हॉटेल चालकांवर कारवाईचे स्पष्ट निर्देष दिले होते. जिल्‍हा प्रशासनाने एका कार्यक्रमात साधारण ५० पेक्षा जास्त लोक असुनयेत, फिजिकल डिस्टन्सींगचे पालन, सॅनेटायझर, मास्कचा वापर बंधनकारक केला होता. असे असतांना नियमावली पायदळी तुडवत शहरात सर्वदुर धुमधडाक्यात लग्नकार्य सुरु होते. खच्चुन भरलेल्या सभागृह, लग्नमंडपात ओसंडून वाहणारी गर्दी आगामी कालखंडात नक्कीच रोगप्रसाराला चालना देणारी आहे. परिणामी जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्वतः या लग्न समारंभाना हजेरी लावत संबधीत पेालिस ठाणे आणि महापालीका प्रशासनाला कठोर कारवाईचे आदेश दिले. 

येथे झाली कारवाई 
यश लॉन, दापोरेकर मंगल कार्यालय, मुक्तांगण हॉल, एमआयडीसीतील बालानी लॉन, श्रीकृष्ण लॉन्स, तडवी सभागृह या मंगल कार्यालयावर छापे टाकून वर- वधु पिता, आयोजक आणि जागा मालक यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनीयमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरु होती. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर पोलीस निरिक्षकांना कारवाईचे अधिकार प्रदान केले होते. त्यानुसार शहर पोलीस स्टेशन, जिल्हापेठ पोलीस स्टेशन, यांच्यासह महापालिका उपायुक्त संतोष वाहुळे आदींच्या संयुक्त विद्यमाने आज शहरात कारवाई करण्यात आली.

आणखी काही लग्‍नसोहळ्यावर छापे
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार रामानंदगन पोलीस निरिक्षक अनिल बडगुजर यांच्यासह सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप परदेशी यांच्यासह कर्मचार्‍यांनी कारवाई केली. यात पोलीस निरिक्षक बडगुजर यांनी रॉलय पॅलेस येथे कारवाई केली. तर संदीप परदेशी यांनी शानबाग मंगल कार्यालय, लाडवंजारी मंगल कार्यालयावर यांच्यावर कारवाई केली. याप्रकरणी लग्नाचे आयोजक तसेच मंगल कार्यालय, हॉटेल मालक व्यवस्थापक यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT