ambulance 
जळगाव

हटला नाही..ऑक्‍सीजन फ्लो मीटर लागून जखमी; पण कोरोना रूग्‍णाचे प्राण महत्‍त्‍वाचे समजून पोहचविले रूग्‍णालयात

आल्हाद जोशी

एरंडोल (जळगाव) : टोळी (ता. एरंडोल) येथील कोरोना रुग्णांची प्रकृती ऑक्सीजन अभावी बिघडल्याने त्याला आपल्या अॅम्बुलन्सने धुळे येथील रूग्णालयात न्यावे लागत होते. एरंडोल येथील सर्वसामान्यांचा देवदूत समजला जाणारा कोरोना योद्धा विक्की खोकरे हा अॅम्बुलन्समधील ऑक्सीजन रुग्णांना फ्लो मीटरचा कॉक तोंडावर आदळून गंभीर जखमी झाला. पण रूग्‍णाचे प्राण वाचविण्यासाठी रूग्‍णालयात पोहचविलेच.
टोळीच्या कोरोना रुग्णांला अॅम्बुलन्सने धुळ्याला नेताना पहिल्या सिलेंडरमधील ऑक्सीजन संपल्याचे रूग्णांच्या पत्नीने त्‍याबाबत सांगितले. त्यासाठी तिने सिलेंडरचे फ्लो मीटर फिरवून पाहिले होते. विक्कीने अॅम्बुलन्स रस्त्याच्या बाजूला लावून नवीन सिलेंडर लावण्याच्या प्रयत्न करताच आधीच्या सिलेंडरचे फ्लो मीटर निघून त्याच्या तोंडावर आदळले. 

अगोदर रूग्‍ण महत्‍त्‍वाचा
तोंडातून मोठ्या प्रमाणावर रक्त वाहू लागले. त्याच्या डोळ्यासमोर अंधेरी चक्कर यायला लागली. पण येथे थांबलो तर रुग्ण वाचणार नाही, हे समजताच विक्कीने जखमी झाल्याची पर्वा न करता आधी रूग्णाला धुळे येथील रूग्णालयात अॅडमिट केले आणि नंतरच स्‍वतःच्या जबड्यातून वाहणाऱ्या रक्‍तावर धुळे येथील नागेज कंडारे, दिगविजय गोयर व हृदयरोग तज्ञ डॉ. प्रांजल पाटील यांच्या मदतीने प्राथमिक उपचार घेतले. आता त्याची प्रकृती ठीक असली तरी जखम मोठी आहे. 

वर्षभरापासून मदतीला धावतोय
अनेक रूग्ण आणि त्यांचे नातलग विक्कीची देवदूतासारखी वाट पाहत आहेत. कोरोना काळात विक्की खोकरे हा तरुण रात्रंदिवस कोरोना रूग्णांना रूग्णालयात दाखल करण्याकामी धडपडतो आहे. मदतीला धावतो आहे आणि रूग्णसेवा हीच ईश्वरसेवा समजून प्रामाणिकपणे काम करतो आहे. यासाठी दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विकीला अभिनंदन आणि शुभेच्छा देणारे पत्र लिहून त्याच्या कार्याचे कौतुक केले.

संपादन- राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambegaon News : कपिल काळेंचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना प्रवेश; राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का!

White vs Brown vs Multigrain Bread: व्हाइट, ब्राउन की मल्टीग्रेन ब्रेड? वजन कमी करण्यासाठी काय आहे बेस्ट? एका क्लिकवर जाणून घ्या!

'नटरंग' नंतर अजय-अतुलसोबत काम का नाही केलं? तुमच्यात भांडण झालं का? रवी जाधव यांनी सांगितलं खरं कारण

B.Ed व LLB सीईटीच्या प्रवेश प्रक्रियेला ८ जानेवारीपासून सुरुवात; पाहा अर्जाची अंतिम तारीख काय?

अथर्व सुदामेला पीएमपीएलचा दणका, 50 हजारांचा दंड भरावा लागणार, बसमध्ये रिल करणं भोवलं

SCROLL FOR NEXT