vaccination center vaccination center
जळगाव

लसीकरणासाठी दुसऱ्या दिवशीही रांगा; ज्येष्ठांचे हाल सुरूच

लसीकरणासाठी दुसऱ्या दिवशीही रांगा; ज्येष्ठांचे हाल सुरूच

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : कोरोना लसीकरणासाठी कालपासून सुरू असलेला गोंधळ दुसऱ्या दिवशीही सुरूच होता. आजही सर्वच केंद्रावर लसीकरणासाठी (Vaccination) रांगा पहायल्या मिळाल्या. काही केंद्रावर ज्येष्ठांना लसीकरणासाठीचे कूपन सकाळीच देण्यात आल्याने त्या केंद्रावर (Vaccine center) गर्दी कमी दिसली. मात्र इतर केंद्रावर गर्दीचे चित्र कायम होते. (queues the next day for vaccinations)

ॲपची साईड सुरूची वेळ द्यावी

कोरोना महामारीवर कोरोना लसीकरणाचे महत्व समजल्याने जो-तो आता आपल्याला सर्वात आधी लसीकरण कसे होईल ते पहात आहे. १८ ते ४४ व ४५ वयावरील नागरिकांचे आता लसीकरण सुरू आहे. लशींचा मुबलक साठा असल्याने १८ ते ४४ वयोगटात ज्यांची नोंदणी झालेली आहे अशानांच लसीकरण होत आहे. मात्र ‘कोविन ॲप’ सतत हँग असल्याने अनेकांना नोंदणी करता येत नाही. ॲपची साईड केव्हाही सुरू होते तशी केव्हाही बंद होते. यामुळे प्रशासनाने ॲपची साईड केव्हा सुरू व बंद होईल याची माहिती देण्याची मागणी नागरिकांची आहे. तासनतास साईड केव्हा सुरू होते व लॉगइन होते याची वाट नागरिक पाहत असतात. यामुळे त्यांचा बराच वेळ संगणकावर ताटकळत बसण्यात जातो.

सकाळी सातपासून रांगा

ज्येष्ठांना कूपन दिले जात असल्याने ते सकाळी सातपासून रांगा लावून उभे असतात. नंतर त्यांना ९ वाजता कुपन दिले जाते. नंतर केव्हातरी त्यांचा क्रमांक लागतो. तोपर्यत संबंधित रांगेमध्येच बसून असतात. अनेक ठिकाणीतर ज्येष्ठांना बसण्यासाठीची व्यवस्थाही नाही. ज्येष्ठांचे हाल होणार नाहीत याची दक्षता जिल्हा प्रशासनाने घेण्याची गरज आहे. अन्यथा रांगेत उभे राहून दूसऱ्याच व्याधी ज्येष्ठांना लागतील.

वेगवेगळया रांगा हव्यात

लसीकरण केंद्रावर एकाचवेळी ज्येष्ठ नागरिक व १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरण होते. यासाठी दोन्ही वयोगटाच्या लसीकरणासाठी वेगवेगळा स्टाफ ठेवून लसीकरण केले तर एकाच दिवसात अनेकांना लसीकरण होईल. सोबतच वेळही लागेल.

ऑनलाइन रांगेत धक्के खात लसीकरण

काल मात्र माझ्यासारख्या वृद्ध माणसाला रांगेत राहूनही नही लस मिळाली नाही. लस कधी मिळेल त्याचीच मी आतुरतेने वाट बघतोय. काल मी सकाळी ७ वाजता रांगेत होतो. लस देण्याचा कार्यक्रम ९ वाजता सुरू होणं अपेक्षित असते, पण १० वाजता आरोग्य सेवक आरामात आले. हळूहळू ११ वाजता लस देण्यासाठी रांगेतील लोकांना घेतात. पहिले २०० लोकांना कुपन वाटले, त्यावेळी खूपच झुंबड उडाली. त्यात माझा टिकाव लागेल कसा? शेवटी मला कोरोनाची लागण झाली तर यास मीच जबाबदार. म्हणून मी आपला माघारी फिरलो. आता पुन्हा तोच राम द्यावा लागेल.

- प्रा. डी. एस. कट्यारे, ज्येष्ठ नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: १३ वर्षांच्या शाळकरी मुलीनं जिंकलं 'Gold'; भल्याभल्यांना जे नाही जमलं, ते करून दाखवलं

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

Miraj Government Hospital Slab Collapse : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी, एकाची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT