Devendra fadnavis eknath khadse sakal
जळगाव

फडणवीस- खडसेंचा फोनवर संवाद; खडसेंचा भोजनासाठी आग्रह

फडणवीस- खडसेंचा फोनवर संवाद; खडसेंचा भोजनासाठी आग्रह

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : पक्ष सोडायला भाग पाडल्याचा वाद कायम असताना माजी मंत्री एकनाथराव खडसेंनी (Eknath khadse) त्यांच्या अपुस्थितीत निवासस्थानी आलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) ‘जेवल्याशिवाय जाऊ नका..’ अशी साद घालत आदरातिथ्य दर्शवले. मात्र, फडणवीसांनी ‘आता नाही, पुढच्या वेळी नक्की जेऊ..’ असे नम्रपणे सांगत खडसेंना प्रतिसादही दिला.. निमित्त होते, त्यांच्या मुक्ताईनगर दौऱ्याचे. (jalgaon-news-devendra-fadnavis-eknath-khadse-phone-conversation)

वादळामुळे नुकसान झालेल्या मुक्ताईनगर, रावेर तालुक्यातील भागाची पाहणी करण्यासाठी फडणवीस मंगळवारी जिल्ह्यात आले होते. जामनेरहून ते थेट मुक्ताईनगरला गेला. खासदार रक्षा खडसेंच्या आग्रहाखातर फडणवीस कोथळीत खडसेंच्या निवासस्थानी चहापानासाठी गेले. माजी मंत्री गिरीश महाजन, आमदार संजय सावकारे आदी त्यांच्यासोबत होते. फडणवीस त्याठिकाणी जवळपास अर्धातास होते. तेथेच त्यांनी चहापान घेतले.

सावकारे बनले माध्यम

फडणवीस खडसेंच्या निवासस्थानी कोथळीत पोचले, तेव्हा खडसे मुंबईत होते. रक्षा खडसेंनी त्यांचे स्वागत केले. चहापान सुरु असताना भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी भ्रमणध्वनी करत खडसे व फडणवीसांमध्ये संभाषण घडवून आणले.

असा होता संवाद..

फोनवरुन नमस्कार झाल्यानंतर खडसे म्हणाले, ‘मी, इकडे मुंबईत आहे.. आपण आलात, आपले स्वागत आहे. मी नसलो तरी जेवल्याशिवाय जाऊ नका..’ या आग्रही विनंतीला फडणवीसांनी ‘आपल्या भागात आलोय. जेवणाचे नियोजन अन्य ठिकाणी आधीच झालेले आहे. पुढच्या वेळी आपल्याकडे नक्की भोजन करेल..’ असे नम्रपणे सांगितले. उपस्थित असलेल्या रक्षा खडसे, गिरीश महाजन, अशोक कांडेलकर आदींनी हा संवाद अनुभवला. खडसे आता भाजपत नाही, ते राष्ट्रवादीचे नेते झाले. फडणवीसांवर नाराजी व्यक्त करत त्यांनी पक्ष सोडला. दोघा नेत्यांमध्ये त्यामुळे शाब्दिक वादही झालेत. मात्र, राजकीय मतभेदापलीकडचे संबंध व त्यातून अनुभवायला आलेल्या या आदरातिथ्याची चर्चा जिल्ह्यात सध्या सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

Video : दगडाच्या काळजाची आई! पोटच्या नकोशा मुलीला रस्त्यावर टाकून गेली पळून; कुत्र्याने बाळाच्या...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Bharatmala Scheme : भारतमाला योजनेला धक्का: सुरत-चेन्नई महामार्ग रद्द होण्याची शक्यता; नाशिकचे हजारो कोटींचे प्रकल्प अधांतरी

Latest Maharashtra News Updates : रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये गणेश मूर्ती घडवण्याचं काम जोमात

SCROLL FOR NEXT