suicide case 
जळगाव

पतीला उठवण्यासाठी गेलेल्‍या पत्‍नीला बसला धक्‍का

पतीला उठवण्यासाठी गेलेल्‍या पत्‍नीला बसला धक्‍का; कामाच्‍या तणावातून इसमाची आत्‍महत्‍या

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : एका फायनान्स कंपनीत क्रेडीट मॅनेजर म्हणून नोकरीला असलेल्या इसमाने कामाच्या तणावातून गळफास घेत आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही; तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्‍याचा पवित्रा नातेवाईकांनी केला आहे. (jalgaon-news-finance-company-manager-suicide-work-load)

जळगाव शहरातील मयूर कॉलनीमधील रहिवासी असलेले प्रदीप धनलाल कापूरे (वय ४५) हे मुथ्थूट होमफिन इंडीया लि. येथे नोकरीला होते. साधारण चार वर्षांपासून म्‍हणजेच १ नोव्हेंबर २०१७ पासून ते क्रेडीट मॅनेजर म्हणून फायनान्‍स कंपनीत होते. त्यांच्याकडे जळगाव, धुळे जिल्ह्यासह औरंगाबाद जिल्ह्याची देखील जबाबदारी देण्यात आली होते. तीन जिल्‍ह्यांच्‍या कामाचा ताणामुळे ते गोंधळून गेले होते. यातूनच त्यांनी सोमवार (२१ जून) पहाटे घरात दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापुर्वी त्यांनी तीन पानी सुसाईड नोट देखील लिहून ठेवली आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पत्‍नी रूममध्‍ये गेली अन्‌

पहाटे सहाच्‍या सुमारास पत्नी सुचिता या मागच्या घरात गेल्या असता त्यांना पतीने आत्महत्या केल्याचे दिसून आले. पतीचा मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला. नातेवाईकांनी मृतदेह उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणला. दरम्यान, कंपनीच्या तणावातून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मयत प्रदीप कापूरे यांच्या पश्चात पत्नी सुचिता, मुलगा कुणाल, मुलगी यज्ञा, आई सूमनबाई आणि बहिण रेखा शिंपी असा परिवार आहे.

अशी आहे सुसाईट नोट

जळगाव, धुळे जिल्ह्यातील मुथ्थूट होमफीन कंपनीत क्रेडीट मॅनेजर म्हणून नोकरीला असतांना ग्राहकांच्या समस्या, जुने प्रकरणे, नवीन प्रकरणे, त्यांच्या येणाऱ्या त्रृटी, ऑनलाईन वर्क, वसूली आदींसह सर्व कामे मी पाहत आहे. दरम्यान माझ्याकडे औरंगाबाद जिल्ह्याची देखील जबाबदारी आल्यामुळे कामाचा ताण अधिक वाढत आहे. त्यामुळे हा ताण सहन होत नाही. त्यात मॅन पावर कमी आणि कामे जास्त अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे. माझ्या पश्चात वारस म्हणून सर्व योजनांचा लाभ माझ्या पत्नीला मिळावा; यासाठी कंपनीतील अधिकारी व सहकारी यांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT