g s society 
जळगाव

ग.स.चे अध्यक्ष पाटील संचालकपदासाठी अपात्र 

उमेश काटे

अमळनेर (जळगाव) : जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीचे (ग.स. सोसायटी) विद्यमान अध्यक्ष मनोज आत्माराम पाटील यांना तिसरे अपत्य असतानाही खोटे व बनावट प्रतिज्ञापत्र तयार करून निवडणूक लढविलेली आहे. त्यामुळे ते संचालकपदास अपात्र आहेत. याबाबत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली असून, त्यांच्यविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी रावसाहेब पाटील व योगेश सनेर यांनी केली आहे. 
मनोज पाटील मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज लिमिटेड (जळगाव) या संस्थेत नोकरीस असून, त्यांनी शासन नियमाप्रमाणे संस्थेपासून तसेच शासनापासूनही माहिती जाणीवपूर्वक लपवून ठेवल्याने संस्थेची व शासनाची दिशाभूल व फसवणूक केली आहे. २९ मे २००७ पासून आजतागायत त्यांच्या वेतनवसुलीबाबत त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत रीतसर शासनदरबारी पाठपुरावा करणार असल्याचे प्रगती गटाचे अध्यक्ष रावसाहेब मांगो पाटील व योगेश सनेर यांनी सांगितले. 

फौजदारी गुन्हा दाखल करा
मनोज पाटील हे मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज लि. जळगाव या संस्थेत नोकरीस असून त्यांनी शासन नियमाप्रमाणे संस्थेपासून तसेच शासनापासूनही माहिती जाणीवपूर्वक लपवून ठेवल्याने संस्थेची व शासनाची दिशाभुल व फसवणूक केली. या प्रकरणी २९ मे २००७ पासून ते आजतागायत त्यांच्या वेतन वसूलीबाबत त्यांच्याविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करणेबाबत श्री. पाटील व श्री. सनेर रितसर शासन दरबारी पाठपुरावा करणार आहेत. 

तक्रार का दाखल केली
प्रगती गटाने ग. स. संस्थेच्या व सभासदांच्या हितासाठी संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या गैरकारभाराबाबत वरिष्ठांकडे तसेच न्यायालयात सनदशीर मार्गाने दाद मागितली. याचे मनोज पाटील यांना वैयक्तिक वाईट वाटल्याने त्यांनी २५ ऑगस्ट २०१९ रोजी जनरल सभेत सभासदांचा तिव्र विरोध असतांना देखील रावसाहेब पाटील व योगेश सनेर या दोघांचे सभासदत्व रद्द करणेसाठी बेकायदेशीर ठराव केला. मात्र जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव यांनी २८ जानेवारी २०२० रोजी माहिती अधिकारात मिळालेला आदेश २ सप्टेंबर २०२० रोजी दोघांच्या बाजूने निकाल दिल्याने व सभासदत्व कायम राहिल्याचे व प्रगती गटाची लोकप्रियता सभासदांमध्ये वाढल्याचे शल्य मनोज पाटील यांना होते. त्यामुळे त्यांनी पूनश्च मानसिक त्रास देवून आमचे स्वास्थ्य खराब केले व पदाचा दुरूपयोग करीत पून्हा आमच्या बाजूने लागलेल्या निकालावर म. सहनिबंधक नाशिक यांचेकडे अपील केले. त्यामुळे आमची सामाजिक व ग.स.च्या राजकारणात बदनामी करण्याच्या उद्देशाने मनोज पाटील हे आमच्याशी वैयक्तिक आकस ठेवून सूडभावनेने वागत होते. आमचा प्रगती गट संपविण्याचा त्यांच्या दृष्ट हेतू होता; म्हणुन नाईलाजास्तव त्यांचे पितळ उघडे पाळावे लागले. हे सभासद यांच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही असे रावसाहेब पाटील व योगेश  सनेर यांनी म्हटले आहे.

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy: ऋतुराज गायकवाड कर्णधार, पृथ्वी शॉही महाराष्ट्र संघात; पहिल्याच सामन्यात शुभमन-अभिषेकच्या संघाला भिडणार

Ahilyanagar Crime: 'जामखेड गोळीबारातील तीन आरोपी जेरबंद'; गावठी पिस्तूल व काडतुसे हस्तगत

Maharashtra Nagaradhyaksha Results 2025 : राज्यात भाजपा १ नंबरचा पक्ष, कोणत्या पक्षाचे किती उमेदवार विजयी? वाचा विभागनिहाय यादी...

धक्कादायक घटना! 'मुलाकडूनच वडिलांचा डोक्यात दगड घालून खून'; मंगळवेढा तालुक्यातील घटना, भलतचं सत्य आलं समाेर..

IND vs PAK U19, Final: वैभव सूर्यवंशी - आयुष म्हात्रे पाकिस्तानी खेळाडूंना भिडले; विकेट्सनंतर घडली चकमक; Video Viral

SCROLL FOR NEXT