gram panchayat fund gram panchayat fund
जळगाव

कोरोना काळात बिनविरोध ग्रामपंचायतींची ‘लॉटरी’

कोरोना काळात बिनविरोध ग्रामपंचायतींची ‘लॉटरी’

सकाळ डिजिटल टीम

अमळनेर (जळगाव) : अगोदरच प्रशासन कोरोनाच्या महामारीत लढण्यात व्यस्त होते, त्यामुळे प्रशासनावर ताण येऊ नये, निवडणूक खर्चाची बचत व्हावी तसेच गावातील एकोपा टिकून राहावा, या उद्देशाने आमदार अनिल पाटील यांनी बिनविरोध निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींना २५ लाख रुपयांचा निधी देण्याची संकल्पना आणली होती. या पार्श्वभूमीवर अमळनेर मतदार संघातील अनेक गावांना कोरोना काळात लॉटरी लागली असून, लेखशीर्ष २५१५ अंतर्गत निधी उपलब्ध करून दिल्यामुळे गावांमध्ये विकासकामे होणार आहेत.

'गाव करी ते राव काय करी?’ या म्हणीचा प्रत्यक्ष प्रत्यय तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून आला. काही ठिकाणी गावकऱ्यांनी एकत्र येत मतदार संघातील काही ग्रामपंचायती बिनविरोध केल्या होत्या. 'ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा आणि विकास कामांसाठी २५ लाखांचा निधी मिळवा’ या आमदार अनिल पाटलांच्या खुल्या ऑफरला अनेक गावांनी प्रतिसाद देत निवडणूक बिनविरोध केली होती. आमदारांनी देखील त्याची दखल घेत अल्पवधीतच यातील असंख्य गावांना विकासकामांसाठी निधीची तरतूद करून आपली शब्दपूर्ती केली आहे. अल्पावधीतच आमदारांनी शब्दाची पूर्ती केल्याने संबंधित गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी आमदारांचे आभार व्यक्त केले आहेत.

या गावांना मिळाला निधी

अमळनेर तालुका

देवळी शुद्ध पाणी प्लांट ७ लाख, देवळी स्मशानभूमी व सांत्वन शेड बांधकाम- ८ लाख, कलाली विठ्ठल मंदिर बांधकाम- १५ लाख, फाफोरे येथे पेव्हरब्लॉक चौक सुशोभीकरण १५ लाख, जळोद सभामंडप बांधकाम- १५ लाख, दापोरी गावदरवाजा- ७ लाख, दापोरी शुद्ध पाणी प्लांट- ५ लाख, दापोरी चौक सुशोभीकरण -३ लाख, टाकरखेडा रस्ता काँक्रिटीकरण- १५ लाख, पिंपळे बुद्रुक सभामंडप बांधकाम- १५ लाख, एकतास संरक्षण भिंत- १५ लाख रुपये, एकरुखी पाइप मोरी बांधकाम -२५ लाख, कुर्हे बुद्रुक सब स्टेशन ते स्मशानभूमीपर्यंत काँक्रिटीकरण रस्ता- १५ लाख ,

पारोळा तालुका

महाळपूर स्मशानभूमीपर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण -१५ लाख, भोलाने स्मशानभूमीपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण - १५ लाख, दळवेल रस्ता काँक्रिटीकरण -१५ लाख, वसंतनगर तांडा रस्ता काँक्रिटीकरण -१० लाख, वसंतनगर तांडा स्मशानभूमी सांत्वन शेड- ५ लाख, इंधवे पेव्हरब्लॉक व चौक सुशोभीकरण -२० लाख, जिराळी संरक्षणभिंत- १० लाख आदी कामे मंजूर झाली असून, लवकरच ही कामे सुरू होणार आहेत.

ग्रामपंचायत निवडणुका टाळाव्यात, सर्व सदस्य बिनविरोध निवडले जावेत, यासाठी आमदारांनी हे आवाहन करत सर्व गावांना विकासकामांची एक खुली ऑफरच दिली होती. त्यानुसार बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींना लेखशीर्ष २५१५ अंतर्गत निधी उपलब्ध केला आहे. या गावांना लोकहिताची विकासकामे मंजूर झाली आहेत.ज्या गावांनी लागलीच कामांची मागणी करून प्रस्ताव सादर केला, त्या गावांना कामे मंजूर झाली असून, उर्वरित गावांना देखील मागणीनुसार लवकरच कामे मंजूर होतील.

- अनिल पाटील, आमदार, अमळनेर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy live : १४ चेंडू ५८ धावा... विराट कोहलीच्या फटकेबाजीने पुन्हा केला कल्ला... सलग दुसऱ्या शतकाला थोडक्यात हुकला

Pune International Film Festival : ‘पिफ’मध्ये ऑस्करच्या यादीतील नऊ चित्रपट पाहण्याची संधी

Japan Viral Video: जपानमध्ये चमत्कारच! रस्त्यावरून गाडी गेली की वाजतं संगीत, व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

Organ Donation Accident : मृतदेहानेही दिलं जीवदान, अल्पवयीन चालकाच्या धडकेत झालेल्या मृत्यूनंतर अवयवदान; तिघांना जिवदान

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात; ख्रिसमसमुळे गुंतवणूकदार सावध; मात्र ओला इलेक्ट्रिकचे शेअर चर्चेत

SCROLL FOR NEXT