accident 
जळगाव

महिला खाली पडताच अनेकांच्या आरोड्या पण..लग्‍न आटोपून येताना काळाचा घाला

राजेश सोनवणे

जळगाव : भुसावळ येथून लग्नाहून घरी परतणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशरच्या धडकेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून पती गंभीर जखमी झाले आहे. ही घटना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. याप्रकरण एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव शहरातील प्रभात कॉलनीत राहणारे किशोर हिरामण तळेले आणि त्यांची पत्नी मिना किशोर तळेले हे भुसावळ येथे नातेवाईकांकडे लग्नासाठी गेले होते. दुपारचे लग्न आटोपून पती- पत्‍नी दुचाकीने (क्र. एमएच १९ डीसी ६०२५) घरी येत होते. काही अंतरावर घर असताना अजिंठा चौफुली ते इच्छादेवी चौक दरम्‍यान दोघेजण घरी जात असतांना महामार्गावरील स्पीड ब्रेकरजवळ दुचाकीवरील तोल गेला. यामुळे मिना तळेले या रस्‍त्‍यावर पडल्या. याच वेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशरने त्यांना चिरडले. यात त्‍यांचा जागीच मृत्‍यू झाला. तर पती किशोर तळेले हे गंभीर जखमी झाले आहे. मृतदेह जिल्हा शासकीय महाविद्यालयात आणण्यात आला आहे. 

काळजाचा ठोका चुकला
सदर अपघात घडला त्‍यावेळी मिना तळेले यांची जोरदार किंचाळी रस्‍त्‍यावरील इतरांच्या काळजाचा ठोका चुकवून गेली. मिना तळेले यांना चिरडून आयशर भरधाव वेगाने निघून गेला. यानंतर अपघातातील मृतदेहाला पाहण्यासाठी गर्दी झाली होती. घटना घडल्‍यानंतर एमआयडीसी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलीस कर्मचारी अल्ताफ पठाण, नितीन पाटील, इम्रान बेग, गणेश शिरसाठ, तुषार चौधरी आदीं रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती तर वाहतूकीचा खोळंबा झाला होता. यावेळी पोलीसांच्या मदत वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तीन पिढ्या पक्षाचं काम करतोय, धड नाव लिहिता न येणाऱ्यांना तिकीट; भाजपचे नाराज आक्रमक, पोलीस बोलावण्याची वेळ

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! अखेर महायुती तुटली, भाजप-शिवसेनेत फूट...सत्ता समीकरणे कोलमडणार की विरोधकांची लॉटरी लागणार?

“साहेब, मी नोकरी सोडली अन् तिकीट गद्दारांना?” छत्रपती संभाजीनगरमध्ये निष्ठावंत BJP कार्यकर्त्यांचा तुफान राडा, पेट्रोल कॅनसह आक्रमक आंदोलन

Alternative Food Apps : 31 डिसेंबरला Swiggy-Zomato संपामुळे बंद; आता कुठून ऑर्डर करू शकता जेवण? हे आहेत स्वस्तात मस्त पर्यायी ॲप

रामानंद सागर यांना धमकावायला चक्क काठ्या घेऊन गेलेले छोटेसे लव-कुश; दोघांना साप दाखवून केले जायचे सीन

SCROLL FOR NEXT