accident
accident 
जळगाव

कंपनीत जाताना भीषण अपघात; डंपरने उडविले एकाचा जागीच मृत्‍यू

सकाळवृत्तसेवा

जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरी इच्छादेवी चौकापुढे भरधाव डंपरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. यात मागे बसलेल्‍या एका इसमाचा मृत्‍यू झाला. तर दुचाकी चालक चालक गंभीर जखमी झाला आहे. त्‍यास उपचारासाठी रूग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे.

शहरातील सिंधी कॉलनीतील आंबेडकर वसतीगृह परिसरात राहणाऱ्या सिध्दार्थ त्र्यंबक मोरे (वय ५५) हे रेमंडमध्ये प्रॉडक्शन विभागात नोकरीला आहेत. सहकाऱ्यांसोबत कामावर जात होते. नेहमीप्रमाणे ते आज देखील सकाळी अक्षय विजय पाटील (वय ३०) हे सहकारी त्यांना घेण्यासाठी सिंधी कॉलनी भाजीपाला मार्केट येथे आल्‍यानंतर दोघेजण दुचाकीने कंपनीत कामावर जात होते. 

अचानक जोरदार आवाज झाला अन्‌ 
कंपनीत जात असताना इच्छादेवी चौकापासून थोडे पुढे गेल्‍यावर दुचाकी (क्र. एमएच १९, सीसी ६७७७) मागून येणाऱ्या डंपर (क्र. एमपी ०४, जीए ३४९२) जोरदार धडक देत उडविले. यात दुचाकीच्या मागे बसलेले सिध्दार्थ मोरे हे दूरवर फेकले गेल्‍यांने त्‍यांचा जागीच मृत्‍यू झाला. तर अक्षय पाटील यांस गंभीर दुखापत झाली आहे. मोरे यांच्या पश्‍चात पत्नी आणि दोन मुले आहेत.

डंपर चालकांवर अंकूश कोणाचा
महामार्ग तसेच शहरातील प्रमुख रस्‍त्‍यांवरून आजही वाळू वाहतूक करणारे डंपर आणि ट्रॅक्‍टर भरधाव वेगाने जात असतात. अशा भरधाव वेगाने धावणाऱ्या डंपरमुळे अनेक अपघात होवून अनेकांचे बळी गेले आहेत. अशा डंपरांवर अंकूश कोणाचा राहिलेला नसून, कोणत्‍याही प्रकारची कारवाई होताना दिसून येत नाही.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara : पालघरमधून हेमंत सावरांना भाजपकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT