corona.jpg sakal
जळगाव

दिलासा..बाधितांची संख्या घटून साडेतिनशेच्या घरात

दिलासा..बाधितांची संख्या घटून साडेतिनशेच्या घरात

राजेश सोनवणे

जळगाव : साधारण महिना- दीड महिना कोरोनाचा (Coronavirus) प्रसार जोरदार वाढल्‍यानंतर जिल्‍ह्‍यातील चित्र दिलासादायक झाले आहे. मागील आठवडाभरापासून आकडा कमी- कमी होत आला आहे. यातच मागील चोवीस तासात जिल्‍ह्‍यात (Jalgaon corona update) आढळून आलेल्‍या बाधितांची संख्या ही साडेतिनशेच्या घरात आली आहे. शिवाय, मृतांचा आकडा देखील खाली असला तरी दिवसभरात दहा जणांचा मृत्‍यू झाला. (jalgaon district corona update positive cases ratio down)

जळगाव जिल्‍ह्‍यात मागील अनेक दिवसांपासून कोरोना रूग्णसंख्या वाढीचा आलेख वरती राहिला. मात्र मागील काही दिवसांमध्ये आकडा कमी होत आहे. महिनाभरापासून लावण्यात आलेले लॉकडाउनच्या निर्बंधांचा हा परिणाम असून येत्‍या काही दिवसात आकडा कमी होण्याची शक्‍यता आहे. मात्र तिसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविण्यात येत असल्‍याने प्रत्‍येकाने काळजी घेणे महत्‍त्‍वाचे आहे.

दहा जणांचा मृत्‍यू

गत चोवीस तासांमध्ये बाधितांचा आकडा कमी झाल्याचे दिसून आले आहे. दिवसभरात ३५७ कोरोना बाधीत आढळून आले असून ६७५ रूग्णांनी मात करत घरी परतले आहेत. मात्र मृताची संख्या थोडी कमी अर्थात १० इतकी झाली असली तरी मृतांचा आकडा चिंता वाढविणारा आहे.

ॲक्‍टीव रूग्‍णही घटले

जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ३७ हजार १३६ रूग्ण बाधित आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख २५ हजार ५३३ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर सद्यस्‍थितीला ९ हजार १४३ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अर्थात बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक असल्‍याने ॲक्‍टिव रूग्‍णांची संख्या देखील आणखी कमी होईल.

असे आढळले रूग्‍ण

जळगाव शहर ४४, जळगाव ग्रामीण २६, भुसावळ ४७, अमळनेर १५, चोपडा ४७, पाचोरा ४, भडगाव ५, धरणगाव २, यावल १०, जामनेर १३, रावेर २०, पारोळा ९, चाळीसगाव ३९, मुक्ताईनगर ४०, बोदवड २९ आणि इतर जिल्ह्यातील ७ असे एकुण ३५७ रूग्ण बाधित आढळून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत कोट्यवधींचं घर विकलं अन् घेतली बाईक! कारण काय? स्टार्टअप फाउंडरने सांगितली धक्कादायक निर्णयामागची कहाणी

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करा, संयुक्त जमीन मोजणीला गती द्या; शक्तिपीठ महामार्गाबाबत आवाहन

Marathi News Live Updates : पुण्यातील नऱ्हेतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकदरम्यान १२ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली

Encroachment : नऱ्हेतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकदरम्यान १२ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली

SCROLL FOR NEXT