mla chimanrao patil
mla chimanrao patil 
जळगाव

कोरोनाची भीती न बाळगता मुलांना पोलिओ डोस द्यावा : आमदार चिमणराव पाटील 

संजय पाटील

पारोळा (जळगाव) : कोरोनाने सर्वांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या कठीण काळातून प्रत्येक जण सावरण्याचा प्रयत्न करत आहे. शासन कोरोनाला हद्दपार करणेकामी प्रयत्नशील असून कोरोनाची लस निघाल्याने नागरिकांच्या मनातील भिती दूर झाली आहे. पण आता नागरिकांनी कोरोनाची भिती न बाळगता पोलिओचा डोस आपल्‍या बालकांना द्यावा; असे आवाहन आमदार चिमणराव पाटील यांनी केले.
कुटीर रुग्णालय येथे कृष्णा मराठे यास प्रथम पोलिओ डोस देवुन लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रांजली पाटील, वैद्यकिय अधिकारी डॉ. योगेश साळुंखे, शिवसेना तालुका प्रमुख प्रा. आर. बी. पाटील, शहर प्रमुख अशोक मराठे, पंकज मराठे, योगेश लोहार यांचेसह कर्मचारी उपस्थित होते. 

पण गाफिल राहू नका
आमदार पाटील म्हणाले, की तालुक्यासह मतदार संघात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होतांना दिसत असला तरी नागरिकांनी गाफिल न राहता गर्दीच्या ठिकाणी तोंडाला मास्‍क बांधावा आणि काळजी घ्यावी. पोलिओ लसीकरणाचे शहरात विविध ठिकाणी केंद्र उभारण्यात आली आहे. उर्वरित कर्मचारी यांची टिम शहरात प्रत्येक घरी जाऊन पोलिओ डोस देणार आहे. यासाठी प्रत्येक पालकाने पाच वर्षाआतील बालकांना डोस द्यावा असे ते म्हणाले. यावेळी तालुका आरोग्य कार्यालय व कुटीर रुग्णालय मार्फत पोलिओ डोस नियोजन करण्यात आले आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक पांड्या ऑन फायर! तिसरी विकेट घेत हैदराबादला दिला सातवा धक्का

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT