lift and robbery 
जळगाव

लिफ्ट मागून बसला गाडीत; साथीदाराला सिग्‍नल दिला अन्‌

सकाळवृत्तसेवा

जळगाव : जळगाव- औरंगाबाद महामार्गाच्या ठेकेदाराला शनिवारी रात्री लिफ्ट मागत एक संशयित गाडीत बसला. ठरल्याप्रमाणे मदत करणाऱ्या ठेकेदाराची गाडीतच चाचपणी करून आपल्या साथीदारांना सिग्नल दिला. इतर दोघांनी निर्जन मार्गावर दुचाकी आडवी लावत वाहन थांबविले. ठेकेदाराला मारहाण करून त्याच्याजवळील रोकड, सोन्याची चेन व अंगठ्या असा सव्वा लाख रुपयांचा ऐवज लुटला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. 
वदायपाडम (जि. नेल्लूर, आंध्र) येथील मूळ रहिवासी सुधीर रविपती (वय ४०, ह.मु. नेरी) यांच्या कंपनीने जळगाव-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पूल व मोऱ्यांच्या बांधकामाचे ठेके घेतले आहेत. त्यांचे कुसुंबा गावाजवळ रात्रंदिवस पुलाचे काम सुरू आहे. शनिवारी सायंकाळी (एमएपी १०, सीए ४११७) या मोटारीने मजुरांना उमाळा गावाजवळील कामाच्या ठिकाणावरून कुसुंबा साइटवर सोडण्यासाठी आले होते. काम समजावून साधारण रात्री अकराच्या सुमारास रविपती त्याच वाहनाने नेरी येथे घरी जाण्यासाठी निघाले होते. 

सुसाट मोटासायकला ओव्हरटेक अन्‌
विमानतळानंतर महामार्गावर तिशीतला एक तरुण लिफ्ट मागण्यासाठी गाडीच्या समोर उभा ठाकला. रविपती यांनी त्याला लिफ्ट दिली. गाडी पुढे चिंचोलीच्या दिशेने निघाली. थोड्याच अंतरावर सुसाट मोटारसायकलवरील डबलसीट तरुणांनी दुचाकी आडवी लावून वाहन थांबविले. रविपती यांना मारहाण केली. एकाने त्यांच्या गळ्यातील १६ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हिसकावली, दुसऱ्याने अंगझडती घेत अंगठ्या व खिशातील पाकीट असा एक लाख २५ हजारांचा ऐवज ओरबाडून घेतला. त्यानंतर कारचा ताबा घेत जळगावच्या दिशेने येत एका पेट्रोलपंपाजवळ लिफ्ट मागणाऱ्यासह असे तिघेही दुचाकी घेऊन जळगाव शहराच्या दिशेने निघून गेले. 

मोबाईल घेऊन पसार 
अनपेक्षितपणे घडलेल्या या घटनेप्रसंगी तिघा संशयितांनी सुधीर रविपती यांचा मोबाईल हिसकावला. फोनपे, गुगल-पे या ऑनलाइन खात्यांचे पासवर्ड विचारून मोबाईल सोबत घेऊन गेले, परिणामी रात्री पावणेबाराला मदत मागणार तरी कशी म्हणून गाडी घेऊन रात्री नेरीला पोचले व सोबतच्या सहकाऱ्यांना घटना कळविली. रविवारी एमआयडीसी पोलिस ठाणे गाठत घडला प्रकार पोलिसांदेखत कथन केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT