valu chori valu chori
जळगाव

आम्‍हाला नाही लागत लॉकडाउन..कोरेाना संक्रमणातही भरते जत्रा

आम्‍हाला नाही लागत लॉकडाउन..कोरेाना संक्रमणातही भरते जत्रा

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : जिल्ह्यात वाढता कोरोना संसर्ग पाहता, ग्रामीण भागातून ग्रांपचायतीनेच जिल्‍हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून गावातील वाळू ठेके बंद करण्याची मागणी केली होती. संपूर्ण गाव पॉझेटीव्ह येण्याच्या भितीतून अव्हाणी येथील ठेका गेल्याच महिन्यात बंद झाला. असे असताना दबावतंत्र वापरुन काही ठेके सुरु असल्याचे समोर आले आहे.

लॉकडाऊन, जनता कर्फ्यूमुळे बांधकाम क्षेत्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्यभरात बांधकामाला बंदी घालण्यात आली आहे. तर, किरणा माल खरेदीसाठीही जिल्हा प्रशासनाने तीन तासांची मुदत आखुन दिली असताना ग्रामीण भागात कोरोना संक्रमण वाढवायला पुरक ठरणाऱ्या वाळू व्यवसायिकांना मात्र, जिल्‍हा प्रशासन पाठीशी घालत असल्याचे चित्र समोर आले आहे. एकेक ठेक्यावर जवळपास ४०० ते ५०० मजूर, परजिल्‍ह्‍यातील वाहनधारक आणि स्थानिक ग्रामस्थ एकत्रीत काम करतात. असे असताना संक्रमण वाढण्याचा धोका लक्षात घेता काही ग्रामपंचातींनी यापुर्वीच विरोध केला आहे. बहुतांश ठेकेदारांनी नदीपात्रातून लाखो ब्रासचा उपसा करुन गावालगतच्या शेतांमध्ये ठिय्ये मांडले आहेत, या ठिय्यांवर प्रचंड गर्दी उसळते.

निष्काळजीचा कळस

गिरणानदी पात्रातील बांभोरी, टाकरखेडा, उत्राण, धरणगाव-नारणा, अशा ठेक्यांवर जवळपास दिड ते दोन हजार मजुर कामाला आहेत. त्यांच्या पैकी कुणीही साधा मास्क लावत नाही. एकाचीही ॲटीजन टेस्ट अद्याप झालेली नाही. आजारी पडला की, गावातील डॉक्टर कडे, तेथून सिव्हील जगला तर, घरी नाही तर, अंत्यसंस्कार करुन ग्रामस्थ मोकळे हेातात. जिवाच्या भितीने कोणी विरोध करत नसल्याचेही एका पदाधिकाऱ्याने सकाळ शी बोलतांना सांगीतले.

ग्रामपंचायीतंवर दबाव

अव्हाणी ग्रामपंचायतने गेल्या महिन्यात जिल्‍हाधिकाऱ्यांना पत्र दिले होते. त्यात गावातील ५० ते ६० लोक वाळू ठेक्यामुळे संक्रमीत झाल्याचे नमुद करण्यात आले आहे. तर,मोठे वाळूठेकेदारांचे ग्रामपंचायतीवरच दडपण असून संपुर्ण गाव जरी संक्रमीत झाले, तरी कुणी ब्र काढणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारच उपमुख्यमंत्री! रात्री उशिरा मुंबईकडे रवाना; प्रथमच महिलेकडे पद

Mumbai Traffic: मुंबईत १ तारखेपासून नवीन वाहतूक नियम; दक्षिण भागात अधिक कठोर नियम, 'या' वाहनांना प्रवेश नाही

Budget 2026: बजेट तयार करण्यासाठी किती वेळ लागतो? ‘ब्लू शीट’ म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या पडद्यामागची प्रक्रिया...

Pune News : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेतेपदी सोपान उर्फ काका चव्हाण यांची निवड

Supreme Court Order: सॅनिटरी पॅड नसेल तर शाळा नाही! सर्वोच्च न्यायालयाचा कडक आदेश

SCROLL FOR NEXT