water supply by tanker
water supply by tanker sakal
जळगाव

पारोळा, भडगाव, चाळीसगावला प्रथमच टँकरद्वारे पाणीपुरवठा

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या (Water scarcity) झळा सुरू झाल्या आहेत. यंदा प्रथमच पारोळा, भडगाव, चाळीसगाव या तीन तालुक्यांत चार टँकरद्वारे पाणीपुरवठा (Water supply tanker) करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी दिली. सतत अवर्षणप्रवण क्षेत्र तालुक्यांसह जिल्ह्यात अमाप वाळूउपशामुळे गेल्या आठ ते दहा वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई होती. बेमोसमी पाऊस, गारपीट व मॉन्सून कालावधीत सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमानामुळे दर वर्षी जिल्ह्याला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. २०१९ पूर्वी झालेल्या जलयुक्त कामांसह सरासरी पर्जन्यमान समाधानकारक असल्याने गेल्या वर्षी जिल्ह्याची वाटचाल जलसमृद्धीच्या दिशेने होऊन जिल्हा टँकरमुक्त झाला होता. (jalgaon district water scarcity pachora chalisgaon first time water supply by tanker)

जिल्ह्यात चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, पारोळा, अमळनेर, बोदवड तालुक्यात बहुतांश ठिकाणी अवर्षणप्रवण क्षेत्र असून, दर वर्षी टंचाई निवारणासाठी टॅंकरची मागणी होती. २०१९ मध्ये ग्रामीण भागात जुलैच्या मध्यापर्यंत सुमारे २१५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. जिल्ह्यात वारंवार उद्‌भवणारा दुष्काळ आणि जलसंकट निवारणासाठी जलसंधारण कामांतर्गत पाणी अडवा-पाणी जिरवा, जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजना कार्यान्वित करण्यात आली होती. शासनस्तरावरून २०१७-१८, २०१८-१९ मध्ये जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण, आपलं गाव, आपलं शिवार, आपलं पाणी आदी योजनांची जिल्ह्यात प्रामुख्याने अंमलबजावणी करण्यात आली होती.

गतवर्षी पाणी पातळीत वाढ

जिल्ह्यात असलेल्या लहान-मोठ्या धरण प्रकल्पांतील गाळ काढून शिवारात शेतकऱ्यांना शेतीसाठी देण्यात आला, तर धरणांमधील गाळ काढण्यात आल्यामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात खोलीकरणामुळे पाणीपातळी बऱ्यापैकी वाढण्यास मदत झाली. सततच्या जलयुक्त शिवार व गाळमुक्त धरण कामांमुळे २०१९ च्या मॉन्सूनच्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील प्रकल्पांसह भूगर्भातील पाण्याची पातळी बऱ्यापैकी वाढण्यास मदत झाल्याने गेल्या वर्षी जिल्ह्याची वाटचाल टँकरमुक्तीकडे झाली होती.

गेल्या वर्षी जिल्ह्यातील विविध प्रकल्पांत उपयुक्त जलसाठा समाधानकारक असल्यामुळे, तसेच संसर्ग प्रादुर्भाव, संचारबंदी, लॉकडाउनमुळे औद्योगिक वापरासाठी पाण्याची उचल झालेली नव्हती. या वर्षी मात्र चाळीसगाव, भडगाव तालुक्यात प्रत्येकी एक आणि पारोळा तालुक्यात दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

-राहुल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी, जळगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT