Raj khan
Raj khan sakal
जळगाव

World No Tobacco Day.. ‘कॅन्सर’वर मात करून फुलविले आयुष्य

सकाळ डिजिटल टीम

चोपडा (जळगाव) : कॅन्सर अर्थात कर्करोग...ज्याचे नाव ऐकून धष्टपुष्ट माणूसही विचलित होऊन जातो आणि समोर येतो मृत्यू...आपल्या देशात कॅन्सरचे सर्वांत मोठे संकट हे युवकांमध्ये वाढत आहे. तंबाखू, गुटख्याच्या व्यसनामुळे (World No Tobacco Day) तरुण कॅन्सरच्या दाढेत ओढले जात आहेत. परंतु जगात असेही लोक आहेत, जे आपल्या इच्छाशक्ती बळावर कॅन्सरवर मात करून आपले पुढील आयुष्य आनंदाने जगत आहेत. असेच एक म्हणजे चोपड्यातील राज मोहम्मद खान शिकलगर होय. राज हे कॅन्सरमुक्त होऊन आता भावी पिढीला व्यसनापासून वाचविण्यासाठी समर्पित भावनेने समाजात काम करीत आहेत. (World-No-Tobacco-Day-raj-khan-cancer)

शहरात इस्माइल खान शिकलगर यांच्या सामान्य कुटुंबात जन्मलेले राज मोहम्मद खान शिकलगर हे रंगकाम करतात. राज यांना तंबाखू, गुटख्याच्या (Tobocco cancer) सवयीमुळे २०१० मध्ये तोंडाचा कॅन्सर झाला. गाठ मोठी होत होत. मृत्यू साक्षात दरवाजा ठोठावत होता. कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्रमंडळी उपचारासाठी पैशांची जमवाजमव करीत होते अन् राज कॅन्सररूपी मृत्यूचा खेळ जवळून बघत होते. आपल्याकडून झालेली चूक आपल्या जवळच्या मंडळींना किती त्रासदायक ठरत आहे, परिवार कसा संकटाचा सामना करीत आहे, हे बघून डोळे पाणावत होते. पण सांगणार कुणाला. तेव्हाच परमेश्वराकडे प्रार्थना करीत भिक्षेत आयुष्य दे, अशी याचना करीत उर्वरित आयुष्य जनजागृतीसाठी अन् इतरांना या व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी खर्ची घालण्याचा पण केला. राज मोहम्मद यांना भिक्षेत आयुष्य मिळाले. ते कॅन्सरमधून बाहेर पडले.

समन्‍वय समितीवर सदस्‍य म्‍हणूनही काम

२०१२ मध्ये कॅन्सरमधून पूर्ण बरे झाल्यानंतर राज मोहम्मद यांनी महिन्यातून १२ दिवस कॅन्सरग्रस्त परिवाराला मदत व मार्गदर्शन करण्याचे ध्येय ठरविले. तंबाखू, गुटखा, विरोधी अभियानासाठी जनमानवता बहुउद्देशीय संस्था व कॅन्सर पेशंट हेल्प सेंटरची स्थापना केली. तत्कालीन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, किशोर राजे निंबाळकर, डॉ. अविनाश ढाकणे यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना जिल्हा तंबाखू नियंत्रण समन्वय समितीवर सदस्य (Raj khan member in District Tobacco Control Coordinating Committee) म्हणून नियुक्त केले आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभाग, आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य, सलाम मुंबई फाउंडेशन, जळगाव जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष व जनमानवता बहुउद्देशीय संस्था, साने गुरुजी फाउंडेशन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. एन. चव्हाण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ भीमाशंकर जमादार, जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक बी. एस. अकलाडे, माध्यमिक बी. जे. पाटील, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा मौखिक आरोग्यधिकारी डॉ. संपदा गोस्वामी, तंबाखू नियंत्रणचे जिल्हा सल्लागार डॉ. नितीन भारती, सलाम मुंबई फाउंडेशनचे संजय ठानगे, जयेश माळी, राहुल बऱ्हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा जागतिक स्तरावर तंबाखू मुक्त शाळा करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

तीनशेवर तरुण व्यसनापासून परावृत्त

राज मोहम्मद खान यांनी आतापर्यंत सहाशेवर कॅन्सर रुग्णांना मदत व मार्गदर्शन केले आहे. आपले जीवन ज्याचामुळे संकटात सापडले व चेहरा पूर्ण बदलला, अशा तंबाखू, गुटख्याच्या विरोधी अभियानात त्यांची तळमळ बघून तीनशेवर युवकांना तंबाखू, गुटख्यापासून परावृत्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: लोकसभेनंतर आता फडणवीसांनी सांगितलं विधानसभेचं गणित; मुख्यमंत्रीपदाबाबत केलं मोठं वक्तव्य

Char Dham Yatra 2024: सावधान नाहीतर रीलच्या नादात जाल जेलमध्ये...उत्तराखंड सरकारने घेतला मोठा निर्णय, अधिकारी तळ ठोकून

Nepal Bans: आता नेपाळनेही MDH, EVEREST मसाल्यांवर केली मोठी कारवाई; आयात आणि विक्रीवर घातली बंदी

Cannes 2024: हात फ्रॅक्चर तरीही कान्समध्ये दिसला ऐश्वर्याचा जलवा; लेक आराध्याचं 'या' कारणामुळे होतंय कौतुक

Neelam Gorhe : जातीय तेढीमुळे आत्महत्या वाढतात;नीलम गोऱ्हे,कृषी क्षेत्रातील चांगल्या गोष्टींकडेही लक्ष द्या

SCROLL FOR NEXT