जळगाव

लसीकरणापासून बेघर, निराधार वंचितच

लसीकरणापासून बेघर, निराधार वंचितच

रमेश पाटील

सारंगखेडा (नंदुरबार) : आरोग्य विभागाच्या प्रयत्नाने जिल्ह्यात कोविड लसीकरणाला वेग आला आहे. शहर, गाव, वाड्या- वस्त्यांवर लसीकरण सुरू आहे. परंतु बेघर व रस्त्यावर भीक मागून पोट भरणारे भिक्षेकरी लसीकरणापासून वंचित आहेत. प्रशासनाने या घटकांकडेही लक्ष देणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे. (nandurbar-news-corona-vaccination-Homeless-destitute-deprived-of-vaccinations)

कोरोना महामारीवर मात करण्यासाठी लसीकरण हा एकमेव प्रभावी उपाय आहे. या लसीकरण मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्वतःचे व समाजाचे कोविडपासून रक्षण करण्याचे आवाहन केले जात आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने पुन्हा लॉकडाउन लागू केले आहे. अपवाद वगळता त्याचे काटेकोरपणे पालनही होताना दिसत आहे.

लसीकरणाचा वेग वाढविला

आरोग्य विभागाकडून शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवून मोहिमेचा वेग वाढविला आहे. ४५ वयोगटातील नागरिकांनी सुरवातीला लसीकरण केले. आता १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण केले जात आहे. त्यानुसार जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचे नियोजन करण्यासह वेगही वाढला आहे.

त्‍यांना लसीकरणासाठी अडचण

जिल्ह्यात लसीकरण केंद्राच्या माध्यमातून रोज दोन ते तीन हजार नागरिकांना कोरोनाची लस दिली जात आहे. लसीकरणाचा वेग वाढत असताना बेघर तसेच भीक मागून उपजिविका करणाऱ्या नागरिकांच्या लसीकरणाचा प्रश्न अजूनही कायम आहे. रस्त्यावर पोट भरणाऱ्या बहुसंख्य ओळखीचे पुरावे म्हणून आधारकार्ड नाही. तसेच मोबाईल नंबरही नाही. त्यातून त्यांना लसीकरणासाठी अडचणी येत आहेत. भिक्षेकरींकडे प्रशासनाचेही दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. शहरासह जिल्ह्यातील रस्त्यावर फिरून भीक मागून जीवन जगणारे व अन्य राज्यातील पोटाची खळगी भरण्यासाठी व व्यवसायासाठी आलेल्या व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लस कशी दिली जाणार, असा प्रश्न आहे. विशेष म्हणजे प्रशासनाकडून यासंदर्भात अद्यापही कोणत्याही हालचाली झालेल्या दिसत नाही.

घरच नाही, तर ‘आधार’ कुठले..

पोटापाण्यासाठी राज्य सोडून विविध राज्यांमध्ये जाऊन फुटपाथवर राहून जगणारे तसेच काहींना भीक मागून पोटाची खळगी भरावी लागते. त्यातच कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी आधारकार्ड किंवा मतदान कार्ड त्यांच्याकडे असेलच असे नाही. त्यामुळे अशा व्यक्तींचे लसीकरण कसे होणार? असा प्रश्न आहे. प्रशासन काय भूमिका घेते, याकडे त्या बांधवांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT