FIR 
जळगाव

क्वारटाईन होण्यास नकार..अखेर 18 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : शहरात कोरोना रुग्ण आढळलेल्या कुटुंबाच्या संपर्कात असलेले हाय रिस्कमधील 18 संशयितांनी संस्थात्मक विलगीकरण होण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास अमळनेर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील ही पहिलीच मोठी कारवाई आहे. यापूर्वीही मार्च महिन्यात दोन जणांनी परदेश वारी करून आल्याचे लपवले होते या कारणास्तव त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शहरातील वाडी चौकाजवळील गुरव गल्ली मधील एक कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यांच्या संपर्कात आलेले गुरव गल्लीमधील 18 जणांना सुरक्षिततेचे उपाय म्हणून क्वारटाईन करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी गेले होते. मात्र तीन कुटुंबातील 18 जणांनी प्रताप महाविद्यालय परिसरातील कोविड केअर सेंटरमध्ये क्वारटाईन होण्यास नकार दिला.  

या पार्श्‍वभूमीवर विजय पाटील यांनी मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांच्या आदेशान्वये अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या 18 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून कॉन्स्टेबल राजेश चव्हाण पुढील तपास करीत आहे. या कारवाई मुळे शहरात खळबळ माजली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेळ प्रसंगी कडक भूमिका घ्यावी लागते, हेच या कारवाई ने दाखवून दिले आहे. त्यांच्या या भूमिकेचे कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Politics: डीके शिवकुमार CM बनण्याआधीच कर्नाटकमध्ये प्रेशर पॉलिटिक्स! दलित-लिंगायत समाजाकडून मोठी मागणी, काँग्रेससमोर नवी डोकेदुखी

Mumbai: रुग्णाला रक्ताची गरज, बेड नाही म्हणत उपचार नाकारले; मुंबईतील मोठ्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Mahur Renuka Devi Temple: माहूर गडावरील श्री रेणुका देवीला आंब्याची आरास; अधिक महिन्यात भाविकांची मोठी गर्दी

Baramati Sugarcane Farming: पणदरेत ‘ऊस शेतीची नवी दिशा’ परिसंवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद; एकरी १०० टन ऊस उत्पादनासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शक दिशा

Chakan Onion Price Row: कांदा दरप्रश्नी चाकण बैठक की राजकीय आखाडा? शेतकरी संघटनेच्या नेत्यांत वाद

SCROLL FOR NEXT