जळगाव

अमळनेरला शासकीय भरड धान्य खरेदी केंद्राला सुरूवात

उमेश काटे

अमळनेर : येथील धुळे रस्त्यावरील शेतकी संघाच्या जीनमध्ये शासकीय भरड धान्य केंद्र सुरू करण्यात आले. आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते काटापूजन करून खरेदीस प्रारंभ करण्यात आला. या वेळी ज्वारी, बाजरी, मका आदी धान्य खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी ज्वारी दोन हजार ६२०, तर मका एक हजार ८५०, बाजरी दोन हजार १५० चा हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. 


धुळे रोडवरील शेतकी संघाच्या जीनमध्ये मालाची खरेदी सुरू करण्यात आली आहे. या वेळी आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते काटापूजन करण्यात आले. तसेच ज्वारी पोतेपूजन करून माल आणलेल्या हिंमत चिमणराव पाटील (निंभोरा) या शेतकऱ्याचा टोपी, रुमाल, नारळ वाढवून सत्कार करण्यात आला. या वेळी रवींद्र पाटील, दीपक पाटील, सचिन बेहरे, नायब तहसीलदार योगेश पवार, पुरवठा अव्वल कारकून नाना पाटील, हिशेब अव्वल कारकून अशोक ठाकरे, पुरवठा निरीक्षक साळुंखे, सहकार अधिकारी सुनील महाजन, शेतकी संघ प्रशासक गणेश महाजन, विक्रीला आणणारे निंभोरा येथील प्रथम शेतकरी हिंमत पाटील, शेतकी संघ व्यस्थापक संजय पाटील, शेतकी संघ कर्मचारी सुभाष पाटील, भटू पाटील, अरुण पाटील, भिकन पवार, डीएमओ संतोष पाटील आदी उपस्थित होते.

 
शेतमाल विकताना विविध ठिकाणी होणारी शेतकऱ्यांची अडवणूक, पिळवणूक रोखण्यासाठी शासनाचे भरड धान्य खरेदी केंद्र हा पर्याय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी धान्य विक्रीसाठी शासकीय भरड धान्य केंद्रावरच आणावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले. शेतकऱ्यांनी शासनाच्या निकषाप्रमाणे मका एक हजार ८५०, ज्वारी दोन हजार ६२०, बाजारी दोन हजार १५० हा शेतमाल १४ टक्क्यांच्या आतील आर्द्रता असलेला शेतमाल विक्रीस आणावा, माल खरेदी करण्यासाठी हेक्टरी ज्वारी १७.५१ क्विंटल, मका ३३.९३ क्विंटल बाजरी १२.६३ अशी खरेदी मर्यादा आहे, अशी माहिती व्यवस्थापक संजय पाटील यांनी दिली. 

...तर मिळू शकतो हमीभाव 
सुका माल आणि प्रत चांगली असल्यास हमीभाव मिळू शकतो. त्यासाठी शेतकऱ्यांना हे केंद्र चांगला भाव देऊ शकते. केंद्रावर शेतकी संघातर्फे आवश्यक ती सुविधा पुरविण्यात आलेली असून, दोन कर्मचारीही नियुक्त करण्यात आले आहेत. ओला मका वाळवणीसाठीही सोय करण्यात आली असून, तालुका खरेदी-विक्री संघाचा कर्मचारीही नियमित केंद्रावर येत राहतील; पण केंद्रावरील सर्व व्यवहार पाहण्यासाठी तहसील कार्यालयाने नियुक्त केलेले कर्मचारी शासकीय कर्मचारी केंद्रावर उपस्थित राहतील. त्यांची सही असल्याशिवाय खरेदी करता येत नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Sawant railway issue : मुंबई-सावंतवाडी, दादर-रत्नागिरी, मुंबई-पंढरपूर आणि नांदेड-पुणे रेल्वे सुरू होणार का? खासदार अरविंद सावंत आक्रमक

Navi Mumbai Fraud : नवी मुंबईत एकलहरी बाबा, टणटण बाबाला अटक; दोघांनी मिळून महिलेला फसवलं; अघोरी पूजेच्या नावे...

Newlywed Bride Death : लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी नववधूचा अंत, रिसेप्शनहून परतताना अपघात; काका आणि मामाचाही मृत्यू, गाडीचं चाक निखळलं अन्...

लग्नात गायत्री दातारची आई असं काय म्हणाली की नवरा श्रीकांत मंडपातच रडायला लागला? व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : जळगाव जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेमुळे १५९ नागरिक बाधित

SCROLL FOR NEXT