sakaharam maharaj tempal sakaharam maharaj tempal
जळगाव

कोरोना इफेक्ट..यंदाही संत सखाराम महाराज यात्रोत्सव "लॉक डाऊन"च !

लालजी ची मूर्ती ठेवून पूजा करून पाच पावले रथ ओढून पुन्हा जागेवर विसर्जन करण्यात येणार आहे.

उमेश काटे

अमळनेर : गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही संत सखाराम महाराज (Sant Sakharam Maharaj) यात्रोत्सवावर कोरोनाचे ढग वावरत आहेत. त्यामुळे यंदाही यात्रा रद्द (Yatra canceled) करण्यात आली. पर्यायाने हा यात्रोत्सवच "लॉक डाऊन" (Lockdown) झाला आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अक्षय तृतीयेला (Akshay Tritiya Festival) स्तंभरोपण, जागेवरच रथपूजा, समाधी मंदिराला पालखीची प्रदक्षिणा घालण्यात येणार आहे. भाविकांसाठी हा सोहळा ऑनलाईन करण्यात येणार असून भाविकांनी गर्दी न करता ऑनलाईन लाभ घ्यावा, असे आवाहन वाडी संस्थानचे गादीपुरुष संतश्री प्रसाद महाराज यांनी केले आहे.

(amalner sant sakharam maharaj yatra festival canceled corona effect)

दरवर्षी अक्षयतृतीयेपासून यात्रोत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. बोरी नदीपात्रात संत सखाराम महाराज मंदिरासमोर यात्रा भरते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने यात्रा आणि धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घातल्याने यंदाही यात्रा रद्द करण्यात आली आहे. परंपरेप्रमाणे यंदाही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत उद्या (ता.१४) अक्षय तृतीयेला सकाळी साडेनऊ वाजता वाडी संस्थानमध्ये स्तंभारोपण, पूजा करण्यात येईल. त्यांनतर दशमीला (ता.२२) र बेलापूरकर महाराज यांच्या दिंडीचे आगमन होईल. मात्र बेलापूरकर महाराज यंदाही "पारंपरिक प्रोटोकॉल" ला तिलांजली देत चारचाकी वाहनाने अमळनेरला येणार आहेत. त्यानंतर समाधीवर त्यांच्या भजनाचा कार्यक्रम होईल. एकादशीला (ता.२३) संध्याकाळी साडेसात वाजता रथोत्सव असतो. गेल्या वर्षाप्रमाणे गावातून मिरवणूक न काढता रथाला बाहेर काढून धुण्यात येईल. वाडी संस्थान मध्ये लालजी ची मूर्ती ठेवून पूजा करून पाच पावले रथ ओढून पुन्हा जागेवर विसर्जन करण्यात येणार आहे. द्वादशीला (ता.२४) अंबरीश टेकडीवर बेलापूरकर महाराज यांचा खिरापतीचा कार्यक्रम होईल. त्रयोदशीला (ता.२५) गरुड हनुमंताचे वहन असते मात्र या दिवशी कृतिकाक्षय असल्याने पुण्यतिथीचा कार्यक्रम होईल. रथाच्या पाचव्या दिवशी पौर्णिमेला पालखी मिरवणूक असते मात्र यंदा प्रतिपदेला पालखी सोहळा होईल, मात्र यंदा हा सोहळा मिरवणूक न काढता सकाळी सहा वाजता पूजा करून बोरी नदीपात्रात समाधी मंदिराला प्रदक्षिणा घालून तेथेच विसर्जन करण्यात येणार आहे.

अर्थचक्राला लागली घरघर...

राज्यस्तरावर येथील संत सखाराम महाराज यात्रोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संपूर्ण राज्यातून लाखो भाविक रथ आणि पालखी मिरवणुकीला हजेरी लावत असतात. पर्यायाने या यात्रोत्सवात दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होऊन अर्थचक्र गतिमान होऊन अर्थव्यवस्था प्रबळ राहते. वाडी संस्थान मध्ये राज्यभरातून मोठया प्रमाणात देणगी मिळते. मात्र गेल्या दोन वर्षापासून "कोरोना"च्या चक्रव्यूहात सर्वच घटक अडकल्यामुळे अर्थचक्रालाच घरघर लागली आहे. पाळणे, खाद्यपदार्थची दुकाने, मौत का कुवा, विविध मनोरंजनाची खेळणी, जादूचे प्रयोग, घरगुती वस्तूंची दुकाने, महिलांच्या विविध आभूषणाची दुकाने, भेळ, पाणीपुरी, पावभाजी, उसाचा रस, आईस्क्रीम अश्या विविध दुकानदारांसमोर पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न उद्भवला आहे. या पार्श्वभूमीवर वाडी संस्थानने या दुकानदारांना आर्थिक पॅकेज देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

(amalner sant sakharam maharaj yatra festival canceled corona effect)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईतील हरित ऊर्जेच्या पुरवठ्यात वाढ, टाटा पॉवरचा तीन कंपन्यांसोबत करार

UP Government : ​योगी सरकारची मोठी ॲक्शन; समाज कल्याण विभागाचे ४ अधिकारी बडतर्फ, ३ निवृत्त अधिकाऱ्यांच्या पेन्शन कपातीचे आदेश

मूळ ओबीसींनाच तिकीट, भाजपसोबत जायचं नाही; स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत शरद पवारांनी दिल्या सूचना

School Bus Accident: नंदुरबारमध्ये भीषण अपघात! स्कूल बस दीडशे फूट खोल दरीत कोसळली; १ विद्यार्थ्याचा मृत्यू, अनेक जखमी

सॅनिटरी पॅडमध्ये लपलेलं 'हे' काय आहे? "तुमचं पॅड खरंच स्वच्छ आहे का?" उजेडात दिसलं धक्कादायक सत्य... जगभरात Viral Video

SCROLL FOR NEXT