Rain 
जळगाव

पातोंडा, जळोद शिवारात अवघा 24 मिमी पाऊस

Jalgaon Rain News: दुष्काळ जाहिर करून पिकविमा मंजूर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा अशा व्यथा आमदार अनिल पाटील यांच्याकडे मांडल्या.

भूषण बिरारी


पातोंडा (ता.अमळनेर) : पातोंडा, अंमळगाव मंडळात जुन व जुलै या मागील दोन महिन्यात अवघा 24 मिलीमीटर पाऊस (Rain) झाला असल्याने मंडळातील पातोंडा,जळोद, मठगव्हाण, रूंधाटी, दहिवद, सावखेडा मुंगसे, दापोरी, खौशी, खेडी व इतर गावांवर दुष्काळाचे संकट (Drought crisis) ओढवले आहे.

शेतकऱ्यांवर आलेल्या आस्मानी संकटातून उभारण्यासाठी पातोंडा व अंमळगाव मंडळात दुष्काळ जाहिर करून पिकविमा मंजूर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा अशा व्यथा आमदार अनिल पाटील यांच्याकडे मांडल्या. याच आशयाचे निवेदन प्रांताधिकारी सीमा आहिरे व तहसीलदार मिलींद वाघ यांना देण्यात आले आहे.

महसूल विभाग व कृषी विभागाच्या पर्जन्य मापनात फरक
पातोंडा येथे ग्रा.पं. तीवर महसूल विभागाचे मॅन्युअल पर्जन्यमापक आहे तर बिज गुणन केंद्र येथे कृषी विभागाचे महावेध प्रणालीचे पर्जन्यमापक आहे. महसूल विभागाचे पर्जन्यमापक हे फक्त पातोंडा गावाची मागील दोन महिन्यातील पावसाची सरासरी 24 मिमी दाखवते तर कृषी विभागाचे महावेध हे संपुर्ण पातोंडा मंडळाची सरासरी 185 मिमी दाखवते. पिकविमा हा मंडळाच्या नुकसानावर आधारीत असून पर्जन्यमापकाच्या या तफावतीमुळे पिकविमा मंजूर होण्यास अडथळे निर्माण होऊ शकतो अशी भिती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. परंतू शासनाने 22 जुन 2020 च्या पत्रान्वये महसूल मंडळस्तरावर बसविण्यात आलेल्या पर्जन्यमापक यंत्राच्या आधारे प्राप्त होणारी माहिती ग्राह्य धरण्यात येऊ नये असे आदेश प्राप्त झाल्याची माहिती तहसिल कार्यालतून प्राप्त झाली आहे. त्यामुळे पिकविमा मंजूर करतांना महसूली मंडळानुसार नुकसान लक्षात घेणे ही शासनाची पध्दत चुकीची असून गावनिहाय नुकसान लक्षात घेऊन पिकविमा मंजूर करण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.

अमळनेर तालुक्यात पंचनामे करून दुष्काळ जाहिर करण्या संदर्भात कृषी , महसूल व पुनर्वसन मंत्री यांचेकडे विनंती करण्यात आली आहे.

-अनिल भाईदास पाटील, आमदार अमळनेर.


पातोंडा व परीसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे, तसेच जुलै अखेरपर्यंत फक्त सात दिवस पाऊस झाला असून तोही सरासरी 24 मिमी एवढाच झाला आहे, त्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून शासनाने पिक नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढावे

- श्री भरत देवाजी बिरारी, सरपंच पातोंडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav Reaction: पुढच्या वर्षी आणखी जोमाने पुनरागमन करू... सूर्यकुमार पॅक अपनंतर काय म्हणाला? कोणावर खापर फोडले?

Rajat Patidar Reaction: खरं सांगायचं तर, आम्ही हा सामना जिंकण्यास पात्र नव्हतो; RCB चा विजय, तरीही रजत पाटीदार असं का म्हणाला?

IPL 2026 Playoff : मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर! शेवटच्या षटकात थरार अन् RCBचा रोमहर्षक विजय; POINT TABLE मध्ये अव्वल स्थानी झेप

PM मोदींमुळे भारतात तेल-गॅस मिळतोय, आवश्यकतेनुसार वापराचं आवाहन योग्यच; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

SCROLL FOR NEXT