Crop Damage 
जळगाव

कापूस, मका,ज्वारीसह इतर पिके गेली वाया; पंचनाम्याची मागणी

नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी कोणत्याही राजकीय नेते आणि शासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी साधी पाहणीदेखील केली नाही.

सकाळ वृत्तसेवा


कजगाव (ता. भडगाव) : परिसरात सोमवारी व मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) सर्वच पिके नष्ट झाली असून, हजारो हेक्टर पिकांचे क्षेत्र बाधित (Crop Damage) झाले आहे. यात प्रामुख्याने कापूस, मका, ज्वारी, तूर आदी पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.

कजगाव परिसरात सोमवारी व मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीने उरलीसुरली शेतातील पिकेही जमीनदोस्त झाली आहेत. शेतांमध्ये तीन ते चार फूट पाणी तुंबले असून, हे पाणी ३५ तासांनंतरही तसेच असल्याने पिके सडतील, अशी स्थिती आहे. अनेक पिकांनी मान टाकल्या आहेत. शेतात तुंबलेले अथांग पाणी बांध फोडून बाहेर काढण्यासाठी शेतकरी केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे चित्र सर्वदूर नजरेस पडत आहे. तुंबलेले पाणी लवकर निघाले तर निदान झालेला खर्च तरी पदरात पडेल, याच आशेने सर्वत्र हेच चित्र नजरेस पडत आहे.


राजकीय नेत्यांची पाठ
मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावला असताना नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी कोणत्याही राजकीय नेते आणि शासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी साधी पाहणीदेखील केली नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.


ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा
शेतकऱ्यांना संकटातून सावरण्यासाठी शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून तत्काळ मदतीचा निधी मंजूर करावा, अशी मागणी भोरटेक येथील शेतकरी नेते अशोक देशमुख यांनी केली आहे.


अतिवृष्टीमुळे कजगावसह परिसरात मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे, यास महसूल, कृषी विभागाला सूचना केल्या आहेत.
- किशोर पाटील, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS DHONI: धोनीने CSK मध्ये २५ टक्के हिस्सा मागितला? अखेर फ्रँचायझीने मौन तोडलं; माहीच्या IPL भविष्याबाबतही मोठं अपडेट

धक्कादायक! चार महिन्यांत २०० हून अधिक कैद्यांना HIV ची लागण, सरकारकडून चौकशीचे आदेश

Bank Holiday: सप्टेंबरमध्ये बँका 14 दिवस बंद! सलग 4 दिवस बँकांना सुट्टी; महाराष्ट्रात किती दिवस बँका बंद?

UPI AutoPay मध्ये मोठा बदल; App बदललं तरी OTT, SIP आणि EMI चे पेमेंट राहणार सुरू

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री डॉ. हिमंत बिस्वा सरमा यांनी कामरूप जिल्ह्यातील खेत्रीजवळील राष्ट्रीय महामार्ग-२७ वरील अपघातस्थळाला भेट दिली

SCROLL FOR NEXT