जळगाव

गिरणा धरणातून सोडले पाणी; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा !

सुधाकर पाटील

भडगाव : गिरणा धरणातून आज साडे अकरा वाजेच्या सुमारास 1 हजार 200 क्युसेसने एका दरवाज्यातून पाणी सोडण्यात आल्याचे गिरणा पाटबंधारे विभागाकडुन सांगण्यात आले. पाणलोट क्षेत्रातील धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यास अजुन पाण्याचा विसर्ग वाढू शकतो. त्यामुळे नदीकाठच्या गावकर्यानी सतर्कता बाळगावी असे आवाहन गिरणा पाटबंधारे विभागाकडुन करण्यात आले आहे. 

गिरणा धरण काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शंभर टक्के भरले. मात्र पाणलोट क्षेत्रातील धरणातून पाण्याचा विसर्ग कमी असल्याने काल पाणी सोडण्यात आले नव्हते. मात्र सकाळी पाण्याची आवक वाढल्याने धरणाचा एक दरवाज्यातून 1 हजार 200 क्युसेसने पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे गिरणा नदीला पूर येण्याची शक्यता आहे. धरणात पाण्याची आवक वाढल्यास अजुन पाण्याचा विसर्ग वाढू शकतो असे गिरणा पाटबंधारे विभागाकडुन सांगण्यात आले. 

गावांना सतर्कतेचा इशारा

धरणातून पाणी सोडल्याने गिरणा नदीला पुर येणार आहे. त्यामुळे नदी किनारी गावाकऱयांनी तसेच नागरिकांनी कोणी ही नदीत जावू नये असा इशारा आवाहन गिरणा पाटबंधारे विभागाकडून दिला आहे. 


गिरणा धरणातून 1200 क्युसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.  नदिकाठावरील गावकर्यानी सतर्कता बाळगावी. पाण्याचा जाऊ नये. 
-धर्मेद्रकुमार बेहरे कार्यकारी अभियंता गिरणा पाटबंधारे जळगाव.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT