Girna Dam
Girna Dam 
जळगाव

गिरणा नदीतून भडगाव शहरासाठी ३.२९ दलघमी पाणीसाठा आरक्षित

सकाळ वृत्तसेवा



भडगाव : भडगाव शहरासाठी गिरणा नदीतून (Girna River) ३.२९ दलघमी पाणी आरक्षित (Water reservation) करण्यात आले आहे. यासंदर्भात कालच राज्याच्या जलसंपदा विभागाने शासन (Department of Water Resources) निर्णय काढला आहे. त्यामुळे भडगाव शहरासाठी प्रस्तावित असलेली पाणीपुरवठा योजनेचा मंजुरीचा मार्ग निकाली निघाला आहे. आमदार किशोर पाटील (MLA Kishor Patil) यांनी पाणी आरक्षणासाठी शासनाकडे पाठपुरवा केला होता.


महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत भडगाव शहरासाठी पाणीपुरवठा योजना शासनाकडे प्रस्तावित आहे. त्यासाठी आश्वासक जलाशयातून पाणी आरक्षित असणे आवश्यक होते. या योजनेंतर्गत गिरणा नदीवर पक्का बंधाराही घेण्यात आला आहे. त्यातून शहरासाठी पाणी मिळणार आहे. त्यासाठी पाणी आरक्षित असणे गरजेचे होते. त्याअनुशंगाने आमदार किशोर पाटील यांनी गिरणा धरणातून शहरासाठी पाणी आरक्षित करण्याची मागणी केली होती. तर गिरणा पाटबंधारे विभागाची एनओसी ही पाहिजे होती. भडगाव पालिकेने शासनाकडे यासंदर्भात प्रस्ताव दाखल केला होता. अखेर राज्याच्या जलसंपदा विभागाने गुरुवारी (ता. ९) गिरणा नदीतून भडगाव शहरासाठी ३.२९ दलघमी एवढा पाणीसाठी आरक्षित केल्याचा शासन निर्णय काढला. त्यामुळे शहरासाठी प्रस्तावित असलेली पाणीपुरवठा योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे. आता बंधाऱ्यासह पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळणे गरजेचे आहे. शासानाच्या शहरासाठी पाणी आरक्षणांच्या निर्णायाचे शहरवासियांनी स्वागत केले आहे.


शहरासाठी गिरणा नदीतून ३.२९ दलघमी पाणी आरक्षित झाल्याने पाठपुराव्याला यश आल्याचा आनंद आहे. आता लवकरच गिरणा नदीवर बंधाऱ्यासह पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळणार आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
-किशोर पाटील, आमदार पाचोरा- भडगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT