raksha khadse 
जळगाव

केळी पिक विम्याबाबत खासदार खडसेंनी मुख्यंमत्र्याकडे केली मागणी !

सकाळवृत्तसेवा

मुक्ताईनगर  : केळी पीक विम्याचे निकष जाचक करून, लॉक डाउनमुळे भरडल्या गेलेल्या केळी उत्पादकांचे कंबरडे मोडू नका. पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना सन २०२०-२१, २०२१-२२ व २०२२- २३ या वर्षाकरिता लागू केलेल्या केळी पिक विमा योजनेचे प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाईत बदल करून पूर्वी प्रमाणेच प्रमाणके लागू करावी, अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

जळगाव जिल्हा हा केळी पिक उत्पादनाकरिता अग्रेसर असून, एकूण ८५ हजार हेक्टर क्षेत्र केळी पिकाखाली असून, सर्व आर्थिक व्यवहार केळी उत्पादनावर अवलंबून आहेत. शासनाने सुरु केलेल्या केळी पिक विमा योजना सन २०१९-२० पर्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी झाली असुन, झालेल्या नुकसानीत शेतकऱ्यांना मिळालेल्या भरपाईमुळे शेतकरी वर्गाचे समाधान होते. मात्र शासन निर्णयानुसार केळी पिक विमा योजनेचे प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाईत केलेल्या बदलामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. केळी पिक हे हिवाळ्यात कमी आणि उन्हाळ्यात जादा तापमान सहन करू शकत नसल्याने प्रत्यक्षात कृषि विद्यापीठाच्या आणि कृषि विभागाच्या मागील १५ वर्षाच्या हवामान माहितीच्या आणि शिफारशीच्या आधारे घेतलेल्या प्रयोगाद्वारे तापमानासाठी निकष लागू केलेले आहे. ५ जुन २०२० रोजी लागू केलेली प्रमाणके ही कमी जादा तापमानात कधीही लागु होणार नाहीत. मागील सलग किमान ५ वर्षाची तापमानाची आकडेवारी पाहता, असे सलग किमी किंवा जादा तापमान कधीही दिसून आले नाही. त्यामुळे निकषात बदल करून पुर्वी प्रमाणेच प्रमाणके आणि खर्च मर्यादा निकष ठेवावेत अशी मागणी केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nora Fatehi Accident: अभिनेत्री नोरा फतेहीचा अपघात, डोक्याला दुखापत; मद्यधुंद कार चालकाने दिली धडक!

Ishan Kishan: पुण्याच्या मैदानात सिलेक्टरला बॅट दाखवली, वर्ल्डकपच्या संघात एन्ट्री घेतली; ईशान किशनच्या स्वप्नवत पुनरागमनाची गोष्ट

Palghar News : पालघरमध्ये पाच वर्षीय मुलीवर अत्याचाराचा धक्कादायक प्रकार; बालसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

Velhe Accident : तीव्र उतारावर नियंत्रण सुटले अन् टेम्पो पलटी; पाबे घाटात भीषण अपघात; १३ मजुर जखमी!

Marathwada News : “साहेब, आम्हाला पण भीती वाटते!” पीक वाचवायचं की जीव; निल्लोड परिसरात अंधारात गहू भरणी करताना शेतकरी धोक्यात!

SCROLL FOR NEXT