CRIME CRIME
जळगाव

किरकोळ वादातून सुनेकडून सासूचा खून !

सासू व सूनेचा वाद विकोपाला गेला आणि ही घटना घडली

सकाळ डिजिटल टीम


भुसावळ : येथील गजानन महाराजनगर भागातील कोटेचा माध्यमिक विद्यालयात सासू व सून यांच्यात झालेल्या वादाचे रूपांतर विकोपाला जाऊन सुनेने सासूच्या मानेवर विळ्याने वार करून खून केला. ही घटना बुधवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घडली.
( family dispute and murder of mother-in-law by daughter in law)

गजानन महाराजनगर भागातील श्रीमती पद्माबाई कोटेचा प्राथमिक व बालवाडी विद्यामंदिर आणि माध्यमिक विद्यालयात आठ वर्षांपासून वॉचमनची नोकरी करणारे रवींद्र सोनवणे परिवारासह शाळेतीलच पत्र्याच्या खोलीत राहतात. त्यांच्यासोबत पत्नी उज्ज्वला सोनवणे व आई द्वारकाबाई पंढरीनाथ सोनवणे राहत होत्या.

...अन् आईचा घात झाला
रवींद्र सोनवणे बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास किराणा दुकानावर माल खरेदीसाठी गेले असता, त्यादरम्यान त्यांची पत्नी उज्ज्वला सोनवणे व आई द्वारकाबाई सोनवणे यांच्यात वाद झाला. तो विकोपास जाऊन उज्ज्वला सोनवणे यांनी धारदार विळ्याने द्वारकाबाई सोनवणे यांच्या मानेवर वार करून ठार मारले.


पोलिसांची घटनास्थळी धाव
माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, निरीक्षक नितीन गणापुरे, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, सहाय्यक निरीक्षक संदीप दुनगहू, विनोदकुमार गोसावी, विशाल सपकाळे व पोलिस कर्मचारी पोचले व शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठविला. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोशी दुर्घटना! ६० तासानंतरही ८ जणांचा शोध नाही, नातेवाईकांचा आक्रोश; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा, आयुक्तांनी काय सांगितलं?

उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह १५ अधिकारी निलंबित; महसूल विभागात गैरप्रकार, मंत्री बावनकुळेंची माहिती

Kaygaon News : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मुख्याध्यापकांनीच उचलला तणनाशकाचा पंप; विद्यार्थी सुरक्षा आणि आरोग्याच्या काळजीसाठी पुढाकार

Mohol News : मोहोळ येथे पंचायत समिती प्रशासन व नगरपरिषद प्रशासनात मोठा संघर्ष, नवीन नगरपरिषद इमारत बांधकामाचा पेटला वाद

Ayodhya Ram Mandir: राम मंदिर चोरीप्रकरण! काँग्रेसला अटल बिहारी वाजपेयींची आठवण; जुन्या भाषणाचा दिला दाखला

SCROLL FOR NEXT