जळगाव

कामगारांच्या मेहनतीच्या पैशांवर कंत्राटदार कंपनी डल्ला !

चेतन चौधरी

 भुसावळ : दीपनगर वीजनिर्मिती प्रकल्पातील कंत्राटी कामगारांतर्फे १८० दिवसांपूर्वी कमी वेतनाची तक्रार दाखल करण्यात आली होती; परंतु आजपर्यंत कंत्राटदार किंवा स्थानिक व्यवस्थापनातर्फे विषय निकाली काढण्यात आलेला नाही. दोन मार्चपासून ते आजवर वारंवार पत्रव्यवहार करूनही व्यवस्थापनास जाग येत नाही. वेळकाढू भूमिका त्या ठिकाणी घेतली जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. 

आवश्य वाचा ः संवेदनशील जिल्हाधिकारी राऊतांमूळे पत्रकाराचे वाचले प्राण, अन पुण्याची पुनरावृत्ती टळली !

दीपनगर वीजनिर्मिती प्रकल्पात महानिर्मितीतर्फे (एमईआरसी) विशेष भत्ता ८०.१५ टक्के अजून कामगारांना बँक खात्यात कपात करून मूळ वेतनावर ५६.१५ यायला हवा, तरी कंत्राटदार कंपनी कामगारांना २०१४ च्या दराप्रमाणे देत आहेत. विचारणा केली असता, पुढील महिन्यात पूर्ण देतो, असे सांगून कामगारांच्या हाती तुरी देत आहे. अद्याप २८ टक्के एवढाच भत्ता देत आहे. यांचे फरक परिपत्रके निघूनही अंमलबजावणी अद्याप केली जात नाही. ३० ऑगस्ट २०१९ ला जी किमान मूळ वेतनवाढ अधिसूचना प्रसारित झाली होती, त्या अधिसूचनेच्या आधारे वीजनिर्मिती प्रशासन व स्थानिक व्यवस्थापनाने वेळोवेळी विविध परिपत्रके प्रसारित करूनही अंमलबजावणी फक्त कागदावरच आहे; परंतु प्रत्यक्षात कामगारांना जुन्याच किमान वेतनानुसार वेतन देण्यात येत आहे, तसेच २० टक्के पूरक भत्ता व विशेष भत्ता कंत्राटदाराने दिला नाही. व्यवस्थापन मात्र सुस्त असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कामगारांच्या मेहनतीच्या पैशांवर कंत्राटदार कंपनी डल्ला मारत असल्याने कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तरी स्थानिक प्रशासनाने याची दखल घेऊन कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे. 

दीपनगर वीजनिर्मिती प्रकल्पात कंत्राटी तत्त्वावर काम करीत असलेल्या कामगारांना त्यांच्या हक्काचा मोबदला मिळत नाही. कमी वेतनाबाबत वीजनिर्मिती प्रशासनाकडे तक्रार करूनही याकडे कानाडोळा केला जात आहे, तरी कामगारांच्या कष्टाचे पैसे पूर्ण मिळावेत. 
- सचिन भावसार, केंद्रीय उपाध्यक्ष, वीज कंत्राटी कामगार संघ 


कंत्राटी कामगारांना मिळणारे कमी वेतन, भत्त्यांमध्ये होणारी कपात यासंदर्भात काही संघटनांकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यावर संबंधित कंपनीकडे माहिती मागितली असून, याची चौकशी करून लवकरात लवकर कर्मचाऱ्यांना त्यांचा मोबदला दिला जाईल, तसेच दोष आढळल्यास कारवाई प्रस्थापित करू. 
- पंकज सनेर, कामगार कल्याण अधिकारी, दीपनगर  

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Political Breaking : बराटे, शिवरकर यांची भाजप मध्ये एन्ट्री; वानवडीमध्ये राजकीय ट्विस्ट!

Crime: तरुणीनं प्रियकराला गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवला; प्रेयसीला राग अनावर, क्रीडांगणात गाठलं अन्..., काय घडलं?

Dharashiv Agriculture : येरमाळ्याच्या तरुण शेतकऱ्याची कमाल; घरच्या शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रयोग करून इराक निर्यातीत यश!

Motor Vehicle Rules: दहा वर्षांची गाडी समजणार जुनी; 'फिटनेस फी' दहा पटींपर्यंत वाढली, केंद्रीय मोटार वाहन नियमांत सुधारणा!

Indian Railway: सण-उत्सवात रेल्वेचा मोठा हातभार; वर्षभरात ४३ हजारांहून अधिक विशेष गाड्या!

SCROLL FOR NEXT