जळगाव

भुसावळच्या रेल्वे हॉस्पिटलमध्ये 24 तासात 15 दलघमी ऑक्सिजनची निर्मिती

चेतन चौधरी

भुसावळ : जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे हॉस्पिटल मधील बेडची संख्या तर कमी होतच असून, यासह बऱ्याच रुग्णांना उपचारादरम्यान ऑक्सिजन ची गरज भासत असून, ऑक्सिजन चा पुरवठा देखील कमी पडत आहे. त्यामुळे यावर उपाय म्हणून, रेल्वे प्रशासनातर्फे प्रशासनाने रेल्वे हॉस्पिटलच्या परिसरात ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामधून 100 बेडला 24 तास पुरेल इतका 15 दलघमी ऑक्सिजन 24 तासांत तयार केला जाणार आहे. लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. 

भुसावळ शहर हे रेल्वेचे जंक्शन आहे. त्यामुळे या ठिकाणी हजारो रेल्वेचे कर्मचारी आहेत. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनातर्फे भव्य रुग्णालय उभारण्यात आले आहे. देशात कोरोना महामारी परिस्थिती लक्षात घेता, रुग्णांना उपचार घेता यावे यासाठी रेल्वे रुग्णालयात देखील स्वतंत्र कोविड कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या ठिकाणी रेल्वे कर्मचाऱ्यांसह इतरही कोरोना बाधित रुग्णांना उपचार केले जात आहे. येथील सोयी सुविधा लक्षात घेता परिसरातील रुग्ण या हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे इतर रुग्णालयाच्या तुलनेत येथील बेड नेहमीच फुल असतात. सध्या कोरोना रुग्णवाढीच्या काळातच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत आहे. भविष्यातही रुग्णांसाठी ऑक्सिजनची गरज अधिक भासेल. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आत्मनिर्भर होण्यासाठी स्वतंत्र ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला.

रेल्वे हॉस्पिटलमध्ये 64 बेड हे कोविड रुग्णांसाठी राखून ठेवण्यात आले आहेत. या सर्व 64 बेडला ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व बेडवर सध्या रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी अनेकांना ऑक्सिजनची गरज भासते. त्यामुळे रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी स्वतंत्र ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचे नियोजन केले आहे. वैद्यकीय पथकाशी चर्चा करून रेल्वे हॉस्पिटलच्या परिसरातच 40 लाख रुपये खर्चातून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सरू होणार आहे. त्यामुळे ऑक्सिजन सिलिंडरच्या टंचाईवर मात करता येणार आहे.

हवा शोषून ऑक्सिजन बाजूला काढणार
गुजरातमधील कंपनीद्वारे ऑक्सिजन प्रकल्पाची उभारणी
केली जाणार आहे. ही यंत्रणा वातावरणातून हवा शोषून
त्यातील ऑक्सिजन बाजूला करणार आहे. हाच 98 टकके शुद्ध ऑक्सिजन रुग्णांपर्यंत पोहोचवला जाणार आहे. तर उर्वरित हवा पुन्हा वातावरणात सोडली जाणार आहे. रेडी टू इन्स्टॉल पद्धतीच्या उपकरणांद्वारे ऑक्सिजन निर्मितीची प्रक्रिया होईल. ऑक्सिजन प्लांटमधून 24 तासांत 95 दलघमी अर्थांत 50 जम्बो सिलिंडर भरतील एवढा ऑक्सिजन मिळेल.

संपादन- भूषण श्रीखंडे

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT