Scam Scam
जळगाव

महात्मा फुले महामंडळ अपहारप्रकरणी भुसावळात कारवाई

तब्बल ७०२ बोगस प्रकरणे तयार करून बीजभांडवल योजनेंतर्गत साडेसहा कोटी रुपयांचा अपहार

सकाळ वृत्तसेवा




जळगावः महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या (Mahatma Phule Backward Classes Development Corporation) योजनेत साडेसहा कोटी रुपयांच्या अपहार (Scam) प्रकरणाचा गुन्हा जळगाव आर्थिक गुन्हे शाखेकडे (Jalgaon Economic Crimes Branch) वर्ग झाला आहे. यात माजी जिल्हा व्यवस्थापक व लेखापाल यांनी दलालाला हाताशी धरून भुसावळातील बोगस लाभार्थी दाखविले आहेत. जे लाभार्थी अस्तित्वातच नाहीत तर काहींचे काल्पनिक नाव व पत्ते वापरले आहेत. या संदर्भात जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने भुसावळातून संदीप प्रभाकर साबळे यास अटक (Arrest) केली असून, त्याच्या गणेशनगरातील घराची शुक्रवारी झडती घेतली. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. (scam case action economic crimes branch bhusawal)

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडून अर्थसहाय्य घेताना बोगस लाभार्थी दाखवून महामंडळ व बँकेच्या अधिकाऱ्यांनी साडेसहा कोटी रुपयांचा अपहार केला असून, त्यात ७०२ बोगस लाभार्थी दाखविण्यात आले आहेत. यात महामंडळ व बँकांचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह एजंट आदींचा समावेश आहे. २०१६ ते २०१८ या कालावधीत हा अपहार झाला असून, या प्रकरणी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक वैशाली जाधव यांनी २ ऑगस्ट २०१९ रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल झाला होता. यात बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दलालांना हाताशी धरून एकाचा फोटो दुसऱ्याच्या आधारकार्डवर, पत्ता तिसऱ्याचाच अशा प्रकारची तब्बल ७०२ बोगस प्रकरणे तयार करून बीजभांडवल योजनेंतर्गत साडेसहा कोटी रुपयांचा अपहार केला.

आतापर्यंत यांना झाली अटक...
जळगाव आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. या गुन्ह्यात याआधी महामंडळाचा व्यवस्थापक खंडू विठोबा लोहकरे (रा. नाशिक), अकाउंटंट सागर वसंत अडकमोल (रा. रविराज कॉलनी), सुनंदा बाबूराव तायडे (रा. वानखेडे हाउसिंग सोसायटी), प्रकाश लक्ष्मीकांत कुळकर्णी (रा. राधाकृष्णनगर), अमरिश अनिल मोकाशी (रा. सद्‍गुरूनगर) व संजीव वसंत सोनवणे (रा. भुसावळ) यांना अटक झाली आहे, तर मुकेश देवराम बारमासे (रा. नागपूर) यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.

भुसावळातील संशयिताला अटक...
जळगाव आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी (ता. २४) भुसावळ येथून संदीप साबळे याला अटक केली व त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २७ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, शुक्रवारी, जळगाव आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बळिराम हिरे, हवालदार चंद्रकांत शिंदे, राजेंद्र पाटील, अधिकार पाटील व भुसावळ शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी गणेशनगरातील संदीप साबळे याच्या घराची झडती घेतली, मात्र त्यात काहीही आढळले नसल्याचे हिरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिषेक

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

SCROLL FOR NEXT