Teacher Teacher
जळगाव

शिक्षकांना कामाच्या मुल्यमापनावर मिळणार वेतन !

शासनाने विद्यार्थी चाचण्यांवरून शिक्षकांचे मूल्यमापन करणे अयोग्य आहे

चेतन चौधरी



भुसावळ : शिक्षकांच्या (Teacher) कामाच्या मूल्यमापनावर आधारित वेतन देण्यासंदर्भातील शासन निर्णय महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेसह (Maharashtra State Teachers Council) विविध शिक्षक संघटनांनी (Teachers Associations) विरोध केल्यानंतर रद्द करण्यात आला होता. मात्र आता पुन्हा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर आधारित वेतन देण्यासंदर्भात शासन स्तरावर विचार सुरू असल्याने अशा प्रकारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून शिक्षकांचे वेतन निश्चित करण्याला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा विरोध असल्याचे माध्यमिक शिक्षक परिषदेचे तालुका अध्यक्ष तथा जळगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गिरीश एस नेमाडे यांनी सांगितले.
(teachers Association opposes teachers pay based on assessment

याबाबत अधिक माहिती देताना गिरीश नेमाडे यांनी सांगितले की, सर्व विद्यार्थ्यांची आकलन शक्ती एक समान नसते. शिक्षक शिकविताना सर्वच विद्यार्थ्यांसाठी पूर्णक्षमतेने अध्यापन करीत असतो .मात्र सर्व विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी ही भिन्न असते. विद्यार्थी शिक्षकांसाठी एक समान असतात. परंतु सर्व विद्यार्थ्यांना एक सारखेच समजते असे नाही. ग्रामीण आणि शहरी भागात यात नक्कीच शैक्षणिक तफावत आढळून येत असते. इंग्रजी माध्यम ,सेमी माध्यम ,मराठी माध्यम ,ग्रामीण व शहरी भाग, आदिवासी क्षेत्र यात विद्यार्थ्यांमधील क्षमतेत काही ना काही प्रमाणात तफावत ही दिसून येत असते.


शासनाने काढली तीस कोटींची निविदा
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी यासंदर्भात राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री नामदार वर्षा गायकवाड, सचिव वंदना कृष्णा, आयुक्त विशाल सोळंकी यांना पत्र पाठवून विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील कामगिरीनुसार शिक्षकांचे मूल्यमापन करण्याची असंवैधानिक योजना राबविण्यासाठी शिक्षक प्रशिक्षण प्रणालीची तीस कोटी रुपयांची निविदा शासनाने काढली आहे. त्या निविदे प्रकरणी पत्र पाठवून चौकशीची मागणी केली आहे.


वेतन कपातीचा घाट हाणून पाडणार

शासनाच्या विचाराधीन असलेला निर्णय योग्य व मानसशास्त्राला धरून नसल्याने शासनाने विद्यार्थी चाचण्यांवरून शिक्षकांचे मूल्यमापन करणे अयोग्य आहे. त्यामुळे या निर्णयाला महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक परिषदेचा विरोध असून विद्यार्थी गुणवत्तेचे निमित्त करून शिक्षकांच्या वेतन कपातीचा घातलेला घाट हाणून पाडला जाईल असे भुसावळ तालुका माध्यमिक शिक्षक परिषद अध्यक्ष व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गिरीश एस नेमाडे यांनी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता ट्रेनच्या जनरल कोचमध्ये फक्त १५० प्रवाशांना तिकिटे मिळणार! रेल्वे मंत्रालय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Tesla Car Booking Offer: बंपर ऑफर...! आता फक्त २२ हजारांत बुक करता येणार 'टेस्ला'ची अलिशान कार, मात्र...

Sangli Crime : वाढत्या गुन्हेगारीची गृह विभागाकडून दखल; जिल्हा प्रशासन, पोलिसांचे मॅरेथॉन बैठक; अहवाल लवकरच मुख्यमंत्री फडवणीस यांच्याकडे

Vaishnavi Hagawane Case Update : नीलेश चव्हाणच्या जामीन अर्जावर २२ जुलैला सुनावणी; वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण

Pune Crime : गोकुळनगरमध्ये तरुणावर कोयत्यांनी हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक

SCROLL FOR NEXT