जळगाव

देशभरातील ४१ आयुध निर्माणीतून ८२ हजार कर्मचाऱ्यांनी ‘लंच बॉयकॉट’

सकाळवृत्तसेवा

भुसावळ : केंद्र शासनाने देशभरातील आयुध निर्माणींचे निगमीकरणाचा निर्णय घेतला आहे. या विरोधात येथील आयुध निर्माणीत आज (ता. २९) राष्ट्रीय संघर्ष समितीच्या आदेशानुसार देशभरातील ४१ आयुध निर्माणीतून ८२ हजार कर्मचाऱ्यांनी ‘लंच बॉयकॉट’ अभियान राबविले. यात दुपारच्या जेवणाचा त्याग करून सरकार चे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. 

चिंता वाढतेय...जिल्ह्यात नवीन चोवीस कोरोना बाधित 
आयुध निर्माणी निगमीकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांतर्फे विविध पातळ्यांवर आंदोलन केले जात आहे. यात २१ मेस काळे फीत लावून तर २२ रोजी पंतप्रधान आणि केंद्रीय रक्षा मंत्र्यांना ई-मेलद्वारे कर्मचाऱ्यांनी निवेदने पाठविली. तर आज (ता. २९) आयुध निर्माणी भुसावळ येथेही ‘लंच बॉयकॉट’ अभियान सोशल डिस्टंसिंग चे माध्यमातून राबविण्यात आले. सकाळी सर्व कर्मचारी हातामध्ये पोस्टर घेऊन सरकारच्या निगमिकरण निर्णयाचा विरोध दर्शवीत होते. पोस्टरवर "निगमिकरण रद्द करो", "ओएफबी मे निगमिकरण नही चलेगा" अशा प्रकारे घोषवाक्य लिहून सरकार चे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला.

या प्रसंगी संयुक्त संघर्ष समितीद्वारे सरकारच्या आयुध निर्माणी निगमिकरण निर्णयाविरोधात प्रदर्शन करण्यात आले. 
आंदोलनाच्या यशस्वितेसाठी दिनेश राजगिरे, प्रकाश कदम, किशोर चौधरी यांच्या मार्गदर्शनात किशोर पाटील, प्रवीण मोरे, नाना जैन, जे. एच. बिंद्रा, प्रशांत सपकाळे, संजय साळुंखे, अनिल सोनवणे, किशोर पाटील, पंकज पाटील, महेंद्र वानखेडे, विजु साळुंखे, राजकिरण निकम, दीपक भिडे, पप्पू राजपूत, प्रकाश नेमाडे, विजय साळुंखे यांसह सर्व पदाधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावतीत गॅस सिलिंडरचा गोलमाल; परस्पर बुकींग नंतर आता डिलिव्हरी न मिळताच आला मेसेज...

चार दिवसांनी निर्माण होणारा गजकेसरी योग 'या' चार राशींना करणार मालामाल ! आनंदाचे दिवस होणार सुरू

Ashadhi Wari: आषाढी वारीत तीन जिल्ह्यांतील सर्व पालखी मुक्कामी ‘जर्मन हॅंगर’; सोलापूरसह पुणे, सातारा जिल्ह्यातील निविदांचे अधिकार सीईओंना!

''होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यास तयार, पण...''; ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचा मोठा निर्णय

Junnar News : जुन्नरमध्ये इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT