Water supply 
जळगाव

बोदवड तालूक्यातील १४ गावांचा पाणी प्रश्न मिटणार!

व्हॉल्व ऊघडून मजीप्रा अंतर्गत टाकलेल्या नविन पाईपलाईन मधून पाणीपुरवठा करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा


बोदवड : पुनर्जिवित पाणीपुरवठा योजना (Water supply scheme) कार्यान्वयीत झाल्याने बोदवड तालुक्यातील १४ व मुक्ताईनगर तालुक्यातील ३ गावांचा (Village) पाणीप्रश्न मिटणार आहे. आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) यांच्या हस्ते हिंगणे येथील पाणीपुरवठा योजनेचा शुभारंंभ झाला.

80 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील बोदवड गटातील 51 गावांच्या पुनर्जिवित योजने अंतर्गत असलेल्या हिंगणे MBR येथून मुक्ताईनगर येथील ३ व बोदवड तालुक्यातील 14 गावे असे एकूण 17 गावांना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते व्हॉल्व ऊघडून मजीप्रा अंतर्गत टाकलेल्या नविन पाईपलाईन मधून पाणीपुरवठा करण्यात आला. हिंगणे MBR ची कँपँसिटी 10 लाख लिटर आहे. तालूकाप्रमूख छोटू भोई, विधानसभा क्षेत्र प्रमूख सुनिल पाटील, युवासेना जिल्हाप्रमूख पंकज राणे,युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील, मुक्ताईनगर नगरपंचायतीचे गटनेते पियूष मोरे, गटनेते निलेश शिरसाठ, गटनेते राजेंद्र हिवराळे, नगरसेवक आरीफ आझाद, नगरसेवक मुकेश वानखेडे, नगरसेवक संतोष मराठे, नगरसेवक संतोष कोळी, नगरसेवक वसंता भलभले, महेद्र मोंढाळे, योगेश पाटिल, गोकूळ पाटिल, अण्णा पवार, मजीप्रा अभीयंता चव्हाण, ग्रा पा पु ऊपअभीयंता लोखंडे, तायडे यांची ऊपस्थिती होती.

या गावांचा समावेश
शिरसाळे , कोल्हाडी , चिंचखेड सिम , एनगाव , वरखेड , घाणखेड , वडजी हरणखेड , चिंचखेड प्रबो , हिंगणे , आमदगाव , सोनोटि , जुनोना , निमखेड , सारोळा , माळेगाव , निमखेडी या गावांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi press conference: राहुल गांधींनी दाखवले पोलिसांच्या क्रूरतेचे धक्कादायक फोटो; अमित शाहांचं नाव घेत केला गंभीर आरोप

Live Marathi News Update : ऋतब्रता बॅनर्जी गटाला कोणतीही पुढील मुदतवाढ देण्यास विरोध

Pune Investment Scam: शेअर मार्केट व ऑनलाइन टास्कच्या आमिषाला चौघे बळी; पुण्यात ४६ लाखांची सायबर फसवणूक

Pune Gurupurnima Celebration: पुण्यात गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्सव; मंदिरांपासून शैक्षणिक संस्थांपर्यंत गुरु-शिष्य परंपरेचा सन्मान

Vaibhav Sooryavanshi कडे थेट उपकर्णधारपदाची जबाबदारी! BCCI च्या प्रमुख स्पर्धेत ईशान किशनच्या नेतृत्वात खेळणार

SCROLL FOR NEXT