dancing car road 
जळगाव

हा रस्ताच असाय की, येथे पाहण्यास मिळतात डान्सीग कार अन्‌ गाड्या ​

सकाळवृत्तसेवा

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : परिसरातील बहुतांश रस्त्यांची गेल्या अनेक दिवसांपासून अक्षरशः वाट लागली आहे. जागोजागी लहान मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाल्यानेच हे सर्व रस्ते खराब होत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे. त्यामुळे या सर्व रस्त्यांच्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी व आता पावसाळ्यात तर या रस्त्यांवर वाहन चालविणे धोक्याचे झाले आहे. त्यामुळे या सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. 


लोंढे- पिंजारपाडे रस्ता 
लोंढे ते पिंजारपाडे या सहा किलोमीटर अंतराच्या रस्त्याची अवस्थाही अत्यंत बिकट झाली आहे. मालेगाव तालुक्याला हा रस्ता जोडला गेला आहे. या रस्त्याचे पिंजारपाडा गावापर्यंत तीनतेरा झाले आहे. विसापूर तांडा त्यानंतर पिंजारपाडे असा हा रस्ता असून तो थेट मालेगावला जातो. पिंजारपाडेपासून तीन किलोमीटरवर असलेल्या मालेगाव तालुक्यातील हिसवाळपर्यंत हा रस्ता खराब आहे. हिसवाळच्या पुढे हा रस्ता चांगला झाला आहे. या रस्त्याची दुरुस्ती गेल्या अनेक वर्षांपासून झालेली नाही. त्यामुळे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे. 

मेहुणबारे शिदवाडी रस्ता 
चाळीसगाव- धुळे महामार्गावरील मेहुणबारे ते शिदवाडी हा चार किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यालगत पोलिस ठाणे व ग्रामीण रुग्णालय आहे. सध्या या रस्त्यावरून पायी चालणे देखील कठीण झाले आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकी पंक्चर होते. छोटे मोठे अपघात नित्याचे झाले आहेत. या रस्त्यालगतच्या भराडी नाल्यापर्यंत खड्डेच खड्डे पडल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो. या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने रस्त्याची खडी वर आली आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी शिदवाडीकरांनी केली आहे. 

वरखेडे- लोंढे रस्ता 
वरखेडेपासून चार किलोमीटरचा रस्ताही अत्यंत खराब झाला आहे. रस्त्यावरील डांबर निघून वर आले आहे. साईडपट्ट्या खोल गेल्याने अपघाताची भीती वाढली आहे. या रस्त्यावर शासनाचा मोठा खर्च झालेला असला तरी रस्त्याची पाहिजे तशी दुरुस्ती न झाल्याने रस्ता खराब झाला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडेझुडपे वाढल्याने लहान मोठे अपघात वाढले आहेत. 

पळासरे रस्ता खड्ड्यात 
पळासरे ते वरखेडे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हा रस्ता खराब असल्याने पळासरेच्या ग्रामस्थांना वरखेडे येथे दहा किलोमीटर अंतराच्या फेऱ्याने यावे लागते. वरखेडेकडून पळासरे बारीपर्यंत रस्ता झाला असला तरी पुढे अत्यंत खराब असल्याने पायी देखील चालता येत नाही. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांनी वेळोवेळी समस्या मांडल्या. मात्र, त्यांची दखलच कोणी घेत नसल्याचा अनुभव शेतकऱ्यांना आला आहे. पावसाळ्यात या या रस्त्यावरून चालणे अवघड होते. 
 
शारीरिक व्याधींचे मूळ 
खड्ड्येमय रस्त्यांमुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या वाहनचालक व प्रवाशांना शारीरिक व्याधींचा त्रास वाढला आहे. अनेकांमध्ये पाठीचे व मानेचे दुखणे बळावले आहे. बऱ्याचदा गरोदर माता व वृद्धांसाठी हे रस्ते पार करणे म्हणजे मैलाचा दगड ठरतो. रात्री- अपरात्री हे रस्ते वाहनांसाठी घातक ठरत आहे. शारीरिक व्याधींचे मूळ ठरलेल्या या रस्त्यांची चांगल्या दर्जाचे साहित्य वापरून दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Latest Marathi News Updates: कर्जतमध्ये हालीवली येथे पैशाचा पाऊससाठी अघोरी विद्या

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

SCROLL FOR NEXT