corona 
जळगाव

चाळीसगावत नर्ससह कंपाउंडरला कोरोनाची लागण

सकाळवृत्तसेवा

चाळीसगाव:: चाळीसगाव शहरातील कोव्हीड केअर सेंटरमध्ये काम करणाऱ्या नर्सला व खाजगी दवाखान्यातील कंपाऊडरला कोरानाची लागण झाली आहे. तालुक्यात कोरानाची लागण रोखण्यासाठी प्रशासनाला अपयश येत असल्याचे दिसत आहे. तालुक्यात कोराना बाधितांचा आकडा १६ वर गेल्याने खळबळ उडाली आहे.

चाळीसगाव तालुक्यात कोराना रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहे. काल (ता.६) डोण (ता.चाळीसगाव) येथील दोन महिलांना कोरोनाची लागण  झाल्याचे निष्पन्न झाले होते. आज (ता.७) पुन्हा चाळीसगाव शहरातील कोव्हिड केअर सेन्टरमध्ये काम करणाऱ्या नर्स व खाजगी रुग्णालयातील कंपाऊडर यांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे उघड झाले आहे. .त्यांच्या स्वॅबचा तपासणीचा अहवाल रात्री उशिरा पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका वैद्यकिय आधिकारी डॉ.डी.के. लांडे यांनी दिली. कोरोनाग्रस्त आढळून आलेल्यांमध्ये एक शहरातील हनुमानवाडी तर दुसरा करगाव रोड येथे राहत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. कोरोना बाधितांच्या घरांची पाहणी तहसीलदार अमोल मोरे, डॉ.डि.के.लांडे यांनी केली असून तो परिसर कन्टेनमेंट झोन म्हणून घोषीत केला. शहारातील दोघे कोरोना बाधिताच्या संपर्कात आलेल्या १५ जणांना क्वारंटाईन करण्याची प्रकिया सुरु असून त्यांचे स्वॅब घेवून ते जळगाव येथे तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

आरोग्य खात्यात चाललय तरी  काय ? 
चाळीसगाव तालुक्यातील आरोग्य खात्यातील कर्मचारी आपली सेवा बजावत आहे. चाळीसगाव कोव्हीड केअर सेंटरमध्ये शालेय आरोग्य पथकातील पाच महीला कर्मचारी, याच पथकातील डाँक्टर तपासणी नमुने घेण्यासाठी येथे कार्यरत आहेत. पथकातील नर्सला कोरानाची लागण झाली आहे. आरोग्य कर्मचारी यांचेच आरोग्य धोक्यात आल्याने सर्वसामान्य नागरीकांचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.यामुळे चाळीसगाव तालुक्यातील आरोग्य विभागात मोठा सावळा गोंधळ सुरू असल्याची चर्चा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT