tree broke 
जळगाव

तलावाच्या बांधावरील २८ झाडांची केली कत्तल..गुन्हा दाखल

सरपंचांनी बेकायदा वृक्षतोडीबाबत जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाला विचारणा केल्यानंतर पाझर तलावाच्या संरक्षणाची जबाबदारी ही तिरपोळे ग्रामपंचायतीची असल्याचे पत्र दिले.

सकाळ वृत्तसेवा



मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : तिरपोळे (ता. चाळीसगाव) येथे ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या पाझर तलावाच्या बांधावरील तब्बल २८ डेरेदार वृक्षांची विनापरवाना कत्तल (tree broke) करून त्यांची विल्हेवाट लावणाऱ्या तिघांविरोधात मेहुणबारे पोलिस (Police Case) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिरपोळे येथे गट क्रमांक ७८.०२ येथे उपविभागीय अधिकारी जलसंधारण अधिकारी जिल्हा परिषद उपविभागाने (लघु पाटबंधारे) पाझर तलाव बांधला आहे. हा तलाव तिरपोळे ग्रामपंचायतीच्या अखत्यारित आहे. असे असताना तलावाच्या बांधावरील पिंपळ, आंबा, जांभूळ, बाभूळ अशी डेरेदार २८ झाडे संशयित संजय तिरमली, राहुल तिरमली, अविनाश तिरमली (सर्व रा. तिरपोळे) यांनी ग्रामपंचायतीची कुठलीही परवानगी न घेता १७ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर दरम्यान कापून लंपास केली.

या विनापरवाना वृक्षतोडीबाबत तिरपोळे ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्यासह गावकऱ्यांनी विचारले असता संजय तिरमली याने परवानगी नसल्याचे सांगत सरपंचांना धमकी दिली. यानंतर सरपंचांनी बेकायदा वृक्षतोडीबाबत जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाला विचारणा केल्यानंतर पाझर तलावाच्या संरक्षणाची जबाबदारी ही तिरपोळे ग्रामपंचायतीची असल्याचे पत्र दिले. याप्रकरणी संशयित संजय तिरमली, राहुल तिरमली, अविनाश तिरमली (सर्व रा. तिरपोळे) यांच्याविरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुभाष पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Student Drug Prevention: शासनाचा माेठा निर्णय! शालेय समित्‍या होणार ‘नशा’विनाशक; शाळांच्या व्यवस्थापनात मुख्‍य जबाबदारी

Sharad Pawar Devendra Fadnavis सोयाबीन-कापूस करपले, पाणी-चाऱ्याचा प्रश्न गंभीर; शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केल्या ९ मोठ्या मागण्या

सुरू होऊन ८ महिने नाही झाले तोच निरोप घेणार स्टार प्रवाहची मालिका? मुख्य अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चेला उधाण

Marathi News Live Updates : गणपतीपुळे येथे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी अखेर वस्त्रसंहिता लागू

iPhone 18 Pro खरेदीसाठी देशभरात ग्राहकांच्या रांगा; मुंबई, दिल्ली, बंगळूरूमध्ये मोठी गर्दी

SCROLL FOR NEXT