जळगाव

स्वातंत्र्य सेनानी भावसिंग दोधू पाटील यांचे निधन

दिपक कच्छवा

मेहुणबारे (ता.चाळीसगाव): वरखेडे (ता.चाळीसगाव) येथील रहिवासी व गोवामुक्ती स्वातंत्र्य संग्रामातील सेनानी,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक तथा लेखक भावसिंग दोधु पाटील यांचे आज (ता.१६)रोजी सायंकाळी सात वाजता वयाच्या ९० व्या वर्षी वृध्पकाळाने चाळीसगाव येथे निधन झाले.

वाचा- पारोळ्यात बंद घरावर चोरट्यांनी मारला डल्ला -
 
वरखेडे (ता.चाळीसगाव) येथील भावसिंग दोधु पाटील हे गोवा मुक्तीचे स्वतंत्र सेनानी होते. ते दिव्यांग होते. शिक्षण क्षेत्रातील त्यांची उत्तम कामगिरी असल्याने त्यांना तत्कालीन राष्ट्रपती यांच्या हास्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देखील मिळाला होता. उत्तम लेखन, विविध साहित्य संग्रह, निबंध, वैचारिक, व्यसनमुक्ती, त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलनावर त्यांनी मोठे काम केले आहे.

भा.दो.पाटील यांचा जन्म ११ मे १९३२ रोजी झाला आहे. त्यांनी प्राथमिक शिक्षक म्हणून १९५५ ते १९९० या कार्यकाळात पुणे  परिषद येथे सेवा दिली आहे. त्यांचे विशेष सेवामध्ये महाराष्ट्र प्रशिक्षण संस्था औरंगाबाद प्रतिनियुक्ती कार्यक्रम अधिकारी व साहीत्यनिर्मीती १९७९ते १९८३ या कालावधीत काम पाहीले आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परीषदेच्या प्रयोगिक शाळेवर १९६५ ते १९७५ एक शिक्षकी शाळेसाठी विषेश कार्य केले आहे. आकाशवाणी पुणे व औरंगाबाद १९६७ ते १९९० पर्यंत त्यांनी प्रौढशिक्षणासाठी सुमारे ६० कार्यक्रम केले आहेत.

वाचा- याला म्‍हणतात घरचा आहेर..सत्‍ताधारी नगरसेविकेकडूनच आयुक्‍तांना घेराव

त्याचबरोबर  शिक्षण क्षेत्रात त्यांची खुप मोठी कामगिरी होती.विज्ञान पुस्तिका, प्रकल्प पुस्तिका,उपक्रम पुस्तिका, आदर्श शाळा निकष,आश्रम शाळा,आपंग शिक्षण लेखन, विविध ठिकाणी त्यांनी आपला कामाचा ठसा उमटवला होता.

वरखेडेत आज  होणार अंत्यसंस्कार

स्वातंत्र्य सेनानी भावसिंग दोधु पाटील यांच्या पश्चात पत्नी दोन दोन मुले व एक मुलगी असा परिवार असुन त्यांच्यावर उद्या (ता.१७) रोजी वरखेडे (ता.चाळीसगाव)येथे बारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या या निधनानंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI Women Cricketers Salary: नववर्षाआधी ‘BCCI’कडून महिला खेळाडूंना मोठी भेट; वेतनात केली दुप्पट वाढ

धक्कादायक! पहिल्या पतीला सोडून २८ वर्षीय विवाहिता ४४ वर्षांच्या दुसऱ्यासोबत राहिली, त्याने दारुच्या नशेत केला तीन वर्षांच्या चिमुकल्याचा खून, नातेवाईकांच्या संशयानंतर उलगडली कहाणी

Silent Call Scam Alert : फोन वाजतो, पण आवाजच नाही? सावध राहा, तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं!

Bandu Andekar Arrest : जमिनीवर बेकायदा ताबा घेऊन ५.४० कोटींची खंडणी; आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर अटकेत!

Video Viral: बेडवर झोपलेल्या रुग्णाला डॉक्टरने केली बेदम मारहाण; घटनेचं कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT