Leopard Leopard
जळगाव

'त्या' बिबट्याचा मुक्काम आता पिलखोड भागात; गिरणा पट्ट्यात भीती

गुऱ्हाळ नाल्याजवळ एका शेतातील वासरूचा बिबट्याने फडशा पाडला

दिपक कच्छवा

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : गेल्या चार पाच दिवसापासून वरखेडे (ता.चाळीसगाव) परिसरात शेतकऱ्यांच्या (Farmer) पशुधनावर हल्ला करत असलेल्या बिबट्याने (Leopards) आता आपला मुक्काम पिलखोड (ता.चाळीसगाव) भागात हलवला आहे. पिलखोड येथील गुऱ्हाळ नाल्याजवळ एका शेतातील वासरूचा बिबट्याने फडशा पाडल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली. त्यामुळे गिरणा पट्टयात खळबळ उडाली आहे. चार वर्षापूर्वी गिरणा (Girna) पट्ट्यात नरभक्षक बिबट्याने हैदोस घालत सात मानवी बळी घेतले होते. ही घटना विस्मृतीत जात नाही तोच पुन्हा गिरणा पट्ट्यात बिबट्याने डरकाळी फोडली आहे. त्यामुळे भितीचे वातावरण पसरले आहे.(again leopard attack fears among farmers)

वरखेडेत बिबट्याने गेल्या तीन चार दिवसात वासरू व बकरीचा फडशा पाडला होता.तर रानडुकरांसह मोकाट कुत्र्यांचाही वावर कमी झाला होता. ही रानडुकरे व मोकाट कुत्री बिबट्यानेच शिकार केल्याची चर्चा असतांना बिबट्याने आपला वरखेडे भागातील मुक्काम हलवून तो पिलखोड भागात नेल्याचे आज पहाटे उघडकीस आलेल्या घटनेवरून दिसून येते. वरखेडे येथे काही नागरीकांना बिबट्याचे दर्शन रात्रीच्या सुमारास झाले असतांनाच शेताम बांधलेल्या वासरू व बकरीचा फडशा पाडला. कालरात्री 12.30 वाजेच्या सुमारास हा बिबट्या वरखेडे येथील चिचलवण नाल्यात नजरेस पडला. त्यामुळे शेतकऱ्याची चांगलीच भंबेरी उडाली. तर पिलखोड येथील बापु सुरेश पाटील यांचे चाळीसगाव- मालेगाव रस्त्यावर गुऱ्हाळ नाल्याजवळ शेत आहे. या शेतात त्यांची गुरे बांधलेली असतात. आज पहाटे बापु पाटील हे नेहमीप्रमाणे शेतात गेले असता शेतातील वासरूचा बिबट्याने फडशा पाडल्याचे दिसून आले. त्यांनी या घटनेची माहिती वनविभागाला कळविली. वन विभागाचे प्रकाश देवरे,संजय चव्हाण श्रीराम राजपूत यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.वरखेडे भागात तळ ठोकून असलेला बिबट्या आता पिलखोड भागात पोहचल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Leopard

वेळीच जेरबंद करा अन्यथा...

चार वर्षापूर्वी 2016 मध्ये गिरणा पट्ट्यात नरभक्षक बिबट्याने अक्षरशा धुमाकूळ घालता होता.त्याला शार्प शूटरने गोळ्या घालून ठार केल्यानंतरही गिरणा पट्ट्यातील बिबट्याचे भय संपले नाही.वन विभागाने पिंजरे व ट्रॅप कॅमेरे लावून या बिबटयाचा वेळीच बंदोबस्त करावा अन्यथा 2016ची पुनरावृत्ती होण्याची भिती गिरणा पट्ट्यातील नागरीकांमध्ये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT