जळगाव

मध्य प्रदेश सह पहाडपट्टीतील हजारो मजूर कामाच्या शोधात सपाटीवर!

दररोज सुमारे आठ लाख रुपयांची देवाण घेवाण खानदेशात होते.

ॲड. बाळकृष्ण पाटील

गणपूर (ता चोपडा): खानदेशातील (Khandesh) जळगाव (Jalgaon), धुळे (Dhule) आणि नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरील सपाटीवरच्या गावातील शिवारात मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) काही गावांसह पहाडपट्टीतील हजारो मजूर (Worker) दररोज कामाच्या शोधात येऊ लागले आहे. अक्कलकुवा, खापर , तळोदा, शहादा, शिरपूर, चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर आदी तालुक्याच्या उत्तर सीमेला सातपुडा पर्वताच्या रांगा आहेत. या रांगांमध्ये वसलेल्या वाड्या, पाड्यात शेतीची विशेष कामे नाहीत. त्यामुळे दररोज काम मिळेल या आशेवर दररोज सुमारे पाच हजार मजूर कामासाठी सपाटीवरच्या शिवारात येत आहे. कोळपणी,निंदणी,फवारणी,तण फेकण्यासह विविध प्रकारची कामे हे मजूर (Farm Worker) करते. ( madhya pradesh farm worker in maharashtra search of work)

पहाडपट्टीतील रतनबारा, जावदा, जाम, बोराडी, मालकातर, महादेव, सुळे, सांगवी, पळासनेर, खामखेडा, सत्रासेंन, उमार्टि, खाऱ्या, बाखूर्ली, धवली, वैजापूर, नागलवाडी, जामन्या, हरिपुरा, पाल आदी भागातून दररोज सकाळी सात ते सव्वा सातच्या दरम्यान हे मजूर विविध गावात हजर होते. सध्या पाऊस नसला तरी निंदणीच्या कामांनी वेग घेतला आहे.सपाटीत हे मजूर यावल, इदगाव, सावखेडा, अमळनेर, नरडाना, कापडने, शिंदखेडा, सारंगखेडा, शहादा, तळोदा पर्यंत येऊन काम करते.

पहाटे पाच ते सायंकाळी सात चा प्रवास

हे मजूर पहाटे पाचला उठून सहा पर्यंत डबा घेऊन गाडीजवळ येते. सहा ते सात सव्वा सात प्रवास करून साडे सातला शेतात पोहचतात. मजूर उतरवत गाडी शेवटच्या गावी थांबते आणि तीन वाजता मजूर सुटले की परतीचा प्रवास सुरु होतो. मजूर गोळा करत गाडी सहा ते सात वाजता गावी पोहचते.

मजुरीत वाटप

या मजुरांचा काही ठिकाणी 120 ,130 ते 150 रुपये रोज मिळतो.त्यात मजुराला 100 रुपये मिळतात आणि गाडी भाडे अंतरानुसार ठरते.तर दहा रुपये मुकादम घेतो. काहीवेळा मुकडमचीच गाडी असते. या कामात दररोज सुमारे आठ लाख रुपयांची देवाण घेवाण खानदेशात होते. त्यातून सुमारे पाच लाख रुपये मजुरांना जातात.आणि अडीच तीन लाख रुपये गाडी मालक आणि मुकादम घेतात.

तरुणांचा सहभाग

या मजूर वर्गात तरुणांचा आणि तरुणींचा भरणा नव्वद टक्के आहे.15 ते 40 वयोगटातील तरुण या मजुरवर्गात आहेत.त्यांचा दिवसाचा 12 ते 13 तास वेळ या कामात प्रवासासह जातो

शाळांना सुट्टी असून आमच्या शेतीची कामे आटोपली आहेत.त्यामुळे या कामातून येणाऱ्या मजुरीतून कुटुंबाला पैशांची मदत होते.

-आसाराम पावरा, बाखूर्ली (मध्य प्रदेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

SCROLL FOR NEXT