जळगाव

चोपड्यात सर्वत्र शुकशुकाट; ‘जनता कर्फ्यू’ उत्स्फूर्त प्रतिसाद

सुनील पाटील

चोपडा : येथे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दर बुधवारी कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय चोपडा तालुका व्यापारी महामंडळाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला.  त्यानुसार व्यापारी महामंडळासह प्रशासनाच्या आवाहनास तालुका व शहरातील नागरिक सहकार्य करीत आज शहरात कडकडीत बंद पाळला. त्यामुळे शहरात दिवसभर शुकशुकाट पाहायला मिळाला.  

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असली तरी दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून चोपडा दर बुधवारी बंदचा निर्णय घेण्यात आला. त्याला प्रशासनाने देखील साथ दिलीच आहे. गेल्या बुधवारी काही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडून एकजुटीला तडा देण्याचा प्रयत्न केला. परंतु महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व प्रशासनाच्या प्रतिनिधींनी संबधितांना समज दिल्यामुळे दुकाने तत्काळ बंद करीत सहकार्य केले होते. पण पुन्हा तसे होऊ नये, यासाठी मंगळवारी व्यापरी महामंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर प्रशासनाच्या वतीने दोन हजार रुपये दंड करण्याचा इशारा देण्यात आला. 

या बैठकीला व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष अमृतराज सचदेव, संजय कानडे, जीवन चौधरी, अनिल वानखेडे, सुनील बरडिया, श्‍याम सोनार, संजय श्रावगी, राजेंद्र जैन, नरेंद्र तोतला, प्रफुल्ल स्वामी, नरेश महाजन, प्रा. रवींद्र बडगुजर, मुरलीधर पाटील, घनःश्याम माखिजा, गोपाळ पाटील, पुंडलिक माळी, प्रमोद अग्रवाल आदी उपस्थित होते.

‘नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 
चोपडा तालुका व्यापारी महामंडळासह प्रशासनाने बुधवारी (ता. २३) बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने, प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. तसेच विविध कार्यालये देखील बंद होती. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. ‘जनता कर्फ्यू’ शंभर टक्के यशस्वी झाल्याच दावा महामंडळाने केला आहे.  

संपादन- भूषण श्रीखंडे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT