जळगाव

धुळ्यात कचरा संकलन पुन्हा ठप्प; शंभर टक्के घंटागाड्या, ट्रॅक्टर बंद!

पत्र अद्याप महापालिकेला प्राप्त झाले नसल्याने नवीन कंत्राटदाराला कार्यादेश देता आलेला नाही.

सकाळ वृत्तसेवा


धुळे ः शहरातील कचरा संकलनाची (Garbage collection) गंभीर समस्या सुटण्याचे नाव नाही. वेतन नसल्याच्या कारणावरून वॉटरग्रेस कंपनीकडील कामगारांनी (Workers) काम बंद केल्याने शंभर टक्के घंटागाड्या व ट्रॅक्टर बंद होते. त्यामुळे कचरा संकलन पुन्हा ठप्प झाले. अर्थात जाता-जातादेखील वॉटरग्रेसकडून अडवणुकीचा प्रकार सुरू आहे. महापालिकेतील (Dhule Municipal Corporation) सत्ताधारी व प्रशासनाला मात्र याचे काहीही सोयरसुतक नसल्याचे चित्र आहे.


शहरातील कचरा संकलनाचे काम वॉटरग्रेस प्रॉडक्ट्स (नाशिक) या कंपनीला दिल्यानंतरही तक्रारी, समस्यांचा पाढा गेल्या दोन-अडीच वर्षांपासून संपलेला नाहीत. या प्रकरणी कायम वाद झाल्याने नवीन कंत्राटदाराला कार्यादेश देण्याची कार्यवाही‍ शासनाच्या स्थगितीमुळे थांबली. ही स्थगिती आता उठविल्याचे सांगितले जाते. मात्र, तसे पत्र अद्याप महापालिकेला प्राप्त झाले नसल्याने नवीन कंत्राटदाराला कार्यादेश देता आलेला नाही. त्यामुळे वादग्रस्त वॉटरग्रेसकडूनच हे काम सुरू आहे.


शंभर टक्के वाहने बंद
नेहमीप्रमाणे शहरातील कचरा संकलनाचे काम गुरुवारी पूर्णपणे ठप्प राहिले. वेतन नसल्याने घंटागाडी, ट्रॅक्टरवरील कामगारांनी कामबंद केले. शिवाय वाहनांसाठी डिझेल उपलब्ध नव्हते. त्यामुळे ही वाहने कचरा संकलन करू शकली नाहीत. कामगारांचे वेतन, इंधनासाठी लागणारा दैनंदिन खर्च अशा विविध कामांसाठी महापालिकेने बिल अदा करण्याची मागणी वॉटरग्रेसकडून प्रशासनाकडे झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.


शेवटपर्यंत वरदहस्त अन्‌ ‘कचरा’
कचरा संकलनप्रश्‍नी नागरिक, विरोधकच नव्हे तर महापालिकेतील सत्ताधारी पदाधिकारी, नगरसेवकदेखील ओरड करून थकले. यावर प्रशासनाकडून कठोर भूमिका घेतली गेली नाही. करू... बघू... सुधारणा करायला लावू... दंडात्मक कारवाई करू... अशीच गुळमिळीत उत्तरे दिली गेली. त्यामुळे प्रशासनातील काही वरिष्ठांचा वॉटरग्रेसवर वरदहस्त कायम राहिल्याची चर्चा लपून राहिली नाही. स्थायी समिती सभापतींनी वॉटरग्रेसचे काम बंद करून पर्यायी व्यवस्थेचा आदेश दिल्यानंतरही एक वरिष्ठ अधिकारी वॉटरग्रेसचे काम थांबू नये यासाठी ‘आटापिटा’ करत असल्याची खमंग चर्चा रंगली. शेवटी त्या अधिकाऱ्याची ‘इच्छा’ पूर्ण झाली. मात्र, शहराचा ‘कचरा’ झाला हेही नाकारता येत नाही.


५१ लाख अदा, तीन लाख दंड
दरम्यान, सायंकाळी उशिरा मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेकडून वॉटरग्रेसला सप्टेंबरचे सुमारे ५१ लाख रुपयांचे बिल अदा करण्यात आले. सप्टेंबरच्या या बिलातून तीन लाख रुपये दंडही वसूल केल्याचे सूत्रांनी सांगितले. बिल अदा झाल्याने कदाचित शनिवारी (ता. २९) पुन्हा काम सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

IND vs PAK सामन्यानंतर वातावरण तापलं; सूर्या अन् हार्दिक कुलदीप यादववर भडकले, नेमकं काय घडले; पाहा Viral Video

5G च्या नावाखाली तुमची फसवणूक तर होत नाहीये ना? घरबसल्या 'इथून' चेक करा तुमच्या एरियातलं नेटवर्क

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

Central Railway: शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ, आरक्षण सुरू; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT