District Bank
District Bank 
जळगाव

धुळे जिल्हा बँक निवडणूक: दहा जागांसाठी वीस उमेदवारांमध्ये लढत

सकाळ वृत्तसेवा


धुळे: धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ( Dhule-Nandurbar District Bank) पंचवार्षिक निवडणुकींतर्गत ७९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यात सोमवारी (ता. ८) एकूण ५२ उमेदवारांनी माघार घेतली. तसेच निवडणूक (Election) यंत्रणेकडून एकूण १७ पैकी सात जागा बिनविरोध घोषित झाल्या. त्यामुळे नऊ मतदारसंघांत उर्वरित दहा जागांसाठी २० उमेदवारांमध्ये लढत होईल. ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या प्रयत्नांना प्रामुख्याने धुळे जिल्ह्यातील साक्री आणि नंदुरबार जिल्ह्यातील उमेदवारांनी सुरुंग लावला. त्यात सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलची मोडतोड झाली.


जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी १२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले गेले. त्यांची २१ ला छाननी झाली. यानंतर सोमवारी दुपारी तीनपर्यंत माघारीची प्रक्रिया पार पडली. आज चिन्हवाटप होईल. या कालावधीत ११२ इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. छाननीत सात अर्ज अवैध, तर १०५ अर्ज वैध ठरले होते. काही उमेदवारांनी दोन ते तीन अर्ज भरले होते. माघारीच्या दिवशी ७९ उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिले. पैकी ५२ उमेदवारांनी माघार घेतली. तसेच २७ पैकी सात उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने यंत्रणेने अधिकृतपणे जाहीर केले. सरतेशेवटी नऊ मतदारसंघांच्या दहा जागांसाठी २० उमेदवारांमध्ये लढतीचे चित्र स्पष्ट झाले.



प्रमुख नेत्यांचा हिरमोड
जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी नेत्यांनी सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलची स्थापना केली. मात्र, शिवसेनेने वेगळी चूल मांडली. त्यामुळे पॅनलमध्ये भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश राहिला. या पॅनलचे नेतृत्व माजी मंत्री व भाजपचे आमदार अमरिशभाई पटेल यांच्याकडे सोपविले. मात्र, माघारीच्या निर्धारित वेळेपर्यंत प्रामुख्याने साक्री, नंदुरबार जिल्ह्यातून बिनविरोधाच्या प्रयत्नांना शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेते, पदाधिकाऱ्यांनी सुरुंग लावला. त्यामुळे निवडणूक अटळ झाली. परिणामी, सर्वपक्षीय पॅनलमधील प्रमुख नेत्यांचा हिरमोड झाला. निवडणुकीसाठी निर्धारित केंद्रात २१ नोव्हेंबरला सकाळी आठ ते दुपारी चारपर्यंत मतदान, तर २२ ला सकाळी आठपासून मतमोजणीसह निकाल जाहीर होईल. निवडणुकीसाठी सहकार विभागाच्या नाशिक येथील सहाय्यक निबंधक डॉ. ज्योती लाटकर मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा उपनिबंधक अभिजित देशपांडे निवडणूक निर्णय अधिकारी, मनोज चौधरी सहाय्यक निवडणूक अधिकारी आहेत.


यांच्यात होणार लढत...
लढतीतील मतदारसंघनिहाय प्रतिस्पर्धी उमेदवार : प्राथमिक कृषी पतसंस्था, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, संयुक्त शेती संस्था, धान्य अधिकोश सहकारी संस्था, आदिवासी सेवा सहकारी संस्था- साक्री तालुका : हर्षवर्धन शिवाजीराव दहिते (भाजप, सामोडे), अक्षय पोपटराव सोनवणे (राष्ट्रवादी काँग्रेस, इंदवे), शिंदखेडा तालुका : राजेंद्र देसले (भाजप, देवपूर-धुळे), संध्याबाई बोरसे (अपक्ष, होळ), नंदुरबार तालुका : चंद्रकांत रघुवंशी (शिवसेना, सोनगीरपाडा), पावबा धनगर (भाजप, भोणे), नवापूर तालुका : अभिमन वसावे (काँग्रेस, बिलीपाडा, नवापूर), अमरसिंग गावित (भाजप, कोठळा), अक्राणी महल तालुका : संदीप वळवी (शिवसेना, कात्री), विलास पाडवी (काँग्रेस), महिला प्रतिनिधी : शीलाबाई विजय पाटील (काँग्रेस पुरस्कृत, नवलनगर, ता. धुळे), हिरकरणबाई बाबूराव पाटील (शिवसेना, होळतर्फे रनाळे, ता. नंदुरबार), सीमा तुषार रंधे (भाजप, बोराडी, ता. शिरपूर), भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग- दर्यावगीर महंत (भाजप, सामोडे, ता. साक्री), सुरेश फकिरा शिंत्रे (शिवसेना, रनाळे, ता. नंदुरबार), कृषी व पणन संस्था व शेतमाल प्रक्रिया संस्था- राजवर्धन कदमबांडे (भाजप, धुळे), अंकुश विक्रम पाटील (शिवसेना, बलदाणे, ता. नंदुरबार), इतर शेती संस्था- सुरेश रामराव पाटील (भाजप, देवपूर-धुळे), प्रा. शरद पाटील (काँग्रेस, कुसुंबा, ता. धुळे), लक्षदीप सोनवणे (अपक्ष, नेर, ता. धुळे).


नाईक, सनेर यांच्यासह सात बिनविरोध
निवडणुकीत प्रथम चार आणि माघारीवेळी सोमवारी तीन अशा एकूण सात जागा बिनविरोध झाल्या आहेत. सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलअंतर्गत सोमवारी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार शिरीष नाईक (नवापूर), विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या धुळे मतदारसंघातून काँग्रेसचे भगवान पाटील (कापडणे), इतर मागासवर्गीय मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्‍याम सनेर (शिंदखेडा तालुका) बिनविरोध निवडून आले. तत्पूर्वी, भाजपचे दीपक पाटील (शहादा), प्रभाकर चव्हाण (शिरपूर), भरत माळी (तळोदा), तर शिवसेनेचे आमशा पाडवी (अक्कलकुवा) हे चौघे उमेदवार बिनविरोध निवडून आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT