British coins 
जळगाव

एरंडोलला खोदकाम करतांना आढळली ब्रिटीशकालिन नाणी

कढोली ग्रामपंचायत कार्यालयात उत्खननात सापडलेली ७५ पांढऱ्या रंगाच्या नाण्यांचा पंचनामा करण्यात आला.

सकाळ डिजिटल टीम


एरंडोल : तालुक्यातील कढोली येथे उज्ज्वला नंदकिशोर पाटील (रा. विठ्ठल मंदिर पाटीलवाडा) यांच्या घराचे बांधकाम (Construction of the house) सुरू असल्याने घराचा पाया खोदकाम (Excavation of the foundation of the house) सुरू असताना कामगारांना पांढऱ्या रंगाच्या नाण्यांनी (British coins) भरलेला एक घडा सापडल्याने नंदकिशोर पाटील यांनी याविषयी संबंधितांना माहिती दिली.

या माहितीच्या आधारे एरंडोल प्रभारी तहसीलदार एस. पी. शिरसाट, पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक तुषार देवरे, पोलिस उपनिरीक्षक अविनाश दहिफळे, पोलिस कर्मचारी संदीप सातपुते, मंडळ अधिकारी मुकेश जाधव, तलाठी कट्यारे, सलमान तडवी यांनी कढोली ग्रामपंचायत कार्यालयात उत्खननात सापडलेली ७५ पांढऱ्या रंगाच्या नाण्यांचा पंचनामा समाधान पाटील, ज्ञानेश्वर पाटील, पंडित पाटील या पंचांसमोर झाला.

राणी व्हिक्टोरियाचे चित्र

ही पुरातन ब्रिटिशकालीन नाणी सन १८०० शतकातील असून, नाण्यांवर राणी व्हिक्टोरिया यांचे चित्र आहे. ही नाणी ‘सील’ करण्यात आली असून, कढोली येथून एरंडोल तहसील कार्यालयात ट्रेझरीमध्ये जमा करण्यात आली आहे. पांढऱ्या रंगाची नाणी सापडलेली जागा रामदास वाणी यांची होती. त्यांच्याकडून उज्ज्वला पाटील यांनी विकत घेतल्याचे सांगण्यात आले. खेडी कढोली सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, कोतवाल यांच्यासह ग्रामस्थ यावेळी हजर होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Pakistan Petrol-Diesel: पाकिस्तानात सलग 5 वेळा पेट्रोल-डिझेल दरकपात, भारतात मात्र 4 वेळा दरवाढ; नेमकं कारण काय?

जीवन संपवण्याच्या काही तासांपूर्वी नाचत-गात होती प्रसिद्ध अभिनेत्री; पण नंतर घडलं भयंकर, संचिता उगलेनं टोकाचा निर्णय का घेतला?

गुंगीचं औषध देत अत्याचार, नंतर व्हिडिओ काढला अन्...; वर्गमित्राने तरुणीचा घात केला, भयंकर घटनेतील मौलवी फरार

Latest Marathi News Live Update : नागपूरातील संविधान चौकात उद्या कॉकरोज जनता पार्टीचं आंदोलन

भर गर्दीत रश्मिकाने घेतली विजयची खास काळजी; viral video पाहून नेटकरी म्हणाले, ‘अशी बायको सगळ्यांनाच मिळो!’

SCROLL FOR NEXT