जळगाव

देवदूतासारखा तो धावून आला, अन वाचला नवजात बाळाचा जीव

अल्हाद जोशी

एरंडोल  : कोरोनाच्या संकटात समाजमनातल्या संवेदनाही बोथट होत असल्याची अनेक उदाहरणे दृष्टीस पडतात. अशा वेळी एखादा माणूस मदतीसाठी जेव्हा धावून येतो, तेव्हा तो देवदूतच असतो. एरंडोलचे सामाजिक कार्यकर्ते तथा संवेदनशील मनाचा रुग्णवाहिकेचा चालक असलेल्या विक्की खोकरे या तरुणाने एका नवजात बाळाचे प्राण वाचवून माणसातल्या देवत्वाची प्रचिती आणून दिली. 

फरकांडे (ता. एरंडोल) येथील संजय भिल या आदिवासी तरुणाची पत्नी रुक्मिणीबाई ही एरंडोल येथील खासगी रुग्णालयात प्रसूत झाली आणि अचानक नवजात बाळाची तब्येत बिघडली. डॉक्टरांनी नवजात बाळाला जळगाव येथे बालरोगतज्ज्ञांकडे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. अशा वेळी कोणीही मदतीला येईना. आता या संकटात काय करायचे, या मनःस्थितीत हे अशिक्षित भिल कुटुंब घाबरून गेले. काय करावे, हे समजेना. अशा वेळी एरंडोलमधील विक्की खोकरे हे देवदूतासारखे मदतीला धावत आले. माहिती मिळताच काही क्षणांत रुग्णालयात रुग्णवाहिका घेऊन हजर झाले. भिल कुटुंबाला धीर दिला आणि बाळाला गाडीतच ऑक्सिजन लावून स्वत: ते बाळ हातात घेऊन तडकाफडकी जळगाव येथे गोदावरी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तेथे धावपळ करून डॉक्टरांकडून बाळावर लगेच उपचार करून नवजात बाळाचे प्राण वाचविले. 

तातडीच्या उपचारांमुळे बाळ सुखरूप 
आता बाळ सुखरूप असून, बाळाचे वडील संजय भिल यांनी विक्की खोकरे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून ते केवळ समाजदूतच नाहीत तर माणुसकीचा जिवंत देवदूत आहेत. विक्कीदादामुळेच आमचे बाळ वाचू शकले, अशी भावना व्यक्त केली. विक्की खोकरे यांनी समाजसेवेचे व्रत स्वीकारलेले असून, या कोरोना काळात त्यांनी अनेक पॉझिटिव्ह रुग्णांना त्वरित उपचारासाठी रुग्णालयात आणून माणसातील देवत्वाची प्रचिती आणून दिली. विक्की खोकरे यांनी केलेल्या या चांगल्या कार्यामुळे त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv sena Pune Election: पुण्यात शिवसेनेची युती तुटली? १२३ जागांवर पक्ष स्वतंत्र लढणार? पडद्यामागे काय घडलं?

Sangli Election : ‘माघार घे, तुला कॉप्ट करतो! ’महापालिका निवडणुकीत नेत्यांचे नवे गाजर; सांगलीत ‘स्वीकृत’ राजकारण चर्चेत

Latest Marathi News Live Update : भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी

धक्कादायक! नववर्षानिमित्त मिठाई देण्यासाठी घरी बोलावलं अन् प्रेयसीनं चाकूनं प्रियकराचं गुप्तांगच कापलं, मुंबईत काय घडलं?

Jaipur Tourism: पर्यटकांच्या खिशाला लागणार कात्री! जयपूरच्या ऐतिहासिक स्थळांचे तिकीट झाले दुप्पट; जाणून घ्या नवीन शुल्क

SCROLL FOR NEXT